BSNL eSIM service India 
तंत्रज्ञान

BSNL eSIM service India: आता देशभरात 'ई-सिम'ची सुविधा; टाटा कम्युनिकेशन्स अन् BSNLमध्ये महत्त्वपूर्ण भागिदारी

Tata Communications BSNL partnership latest news: आता तुमच्या फोनमध्ये फिजिकल (प्रत्यक्ष) सिम कार्ड टाकण्याची गरज नाही, जाणून घ्या काय आहे नवीन सुविधा

मोनिका क्षीरसागर

Tata Communications BSNL partnership eSIM service India latest news

नवी दिल्ली: सरकारी दूरसंचार कंपनी BSNLने (भारत संचार निगम लिमिटेड) एक मोठी घोषणा केली आहे. BSNL ने आता टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली असून, या भागीदारीमुळे संपूर्ण देशभरात ई-सिम (eSIM) सेवा सुरू होणार आहे.

ई-सिम (eSIM) म्हणजे काय?

ई-सिम हे एक डिजिटल सिम कार्ड आहे. यासाठी तुमच्या फोनमध्ये फिजिकल (प्रत्यक्ष) सिम कार्ड टाकण्याची गरज नसते. तुम्ही दूरस्थपणे (Remotely) मोबाइल कनेक्टिव्हिटी ॲक्टिव्हेट करू शकता. ज्यांच्याकडे ड्यूल-सिम (दोन सिम वापरता येणारे) फोन आहेत, ते लोक एकाच वेळी ई-सिम आणि नेहमीचे फिजिकल सिम कार्ड वापरू शकतील.

टाटा कम्युनिकेशन्सचा 'Move प्लॅटफॉर्म' देणार eSIM ला बळ

विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान लोकल ऑपरेटरशी कनेक्ट होण्यासाठी ही सेवा खूप फायद्याची ठरणार आहे. टाटा कम्युनिकेशन्सचा 'Move प्लॅटफॉर्म' या ई-सिम सेवेला तांत्रिक पाठबळ देणार आहे. यामुळे BSNL ला त्यांच्या देशभरातील ग्राहकांसाठी ई-सिमची व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे.

डिजिटल क्रांतीकडे एक पाऊल

BSNL च्या या ई-सिम सेवेमुळे ग्राहकांना 2G, 3G आणि 4G सेवांसाठी क्यूआर (QR) कोड स्कॅन करून लगेच कनेक्टिव्हिटी मिळवता येईल. BSNL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए रॉबर्ट रवी यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, "देशभरात ई-सिम सेवा सुरू करणे हे आमच्या राष्ट्रीय दूरसंचार क्षमतेमधील एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. टाटा कम्युनिकेशन्सच्या मदतीने आम्ही नागरिकांसाठी मोबाइल सेवा अधिक सोयीस्कर (Flexible), सुरक्षित (Secure) आणि कार्यक्षम (Efficient) बनवत आहोत."

BSNL ची मजबूत होत असलेली उपस्थिती

ई-सिम व्यतिरिक्त BSNL ने गेल्या काही महिन्यांत देशभरात आपली सेवा विस्तारण्यासाठी अनेक पाऊले उचलली आहेत:

  • 4G सेवांचा विस्तार: BSNL ने नुकताच दिल्लीत 4G नेटवर्क सुरू केला आणि ऑगस्टमध्ये तामिळनाडू सर्कलमध्ये ई-सिम सेवा सुरू केली होती.

  • स्वदेशी 4G नेटवर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच ओडिशाच्या झारसुगुडा येथून संपूर्णपणे स्वदेशी (भारतात बनवलेल्या) तंत्रज्ञानावर आधारित BSNL च्या 4G नेटवर्कचे उद्घाटन केले. यासाठी 97,500 हून अधिक मोबाइल टॉवर्स उभे करण्यात आले आहेत.

  • पोस्ट ऑफिसमध्ये सेवा: कंपनीने पोस्ट विभागासोबत (डाक विभाग) करार करून देशातील 1.65 लाख पोस्ट ऑफिसमधून सिम कार्ड विक्री आणि मोबाइल रिचार्ज सेवा देण्यास सुरुवात केली आहे. या नवीन ई-सिम सुविधेमुळे BSNL चे ग्राहक आता अधिक आधुनिक आणि डिजिटल सेवांचा लाभ घेऊ शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT