Samsung Galaxy Tab S12 Ultra File Photo
फीचर्स

Samsung Galaxy Tab S12 Ultra आणि S12+ लाँच; पाहा सर्व फीचर्स आणि किंमत

सॅमसंगने Galaxy Tab S12 Ultra आणि Galaxy Tab S12+ हे दोन नवीन टॅबलेट लाँच केले आहेत. या दोन्ही टॅबलेट फोनबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

पुढारी वृत्तसेवा

Samsung Galaxy Tab S12 Ultra

नवी दिल्ली: सॅमसंगने Galaxy Tab S12 Ultra आणि Galaxy Tab S12+ हे दोन नवीन टॅबलेट लाँच केले आहेत. मोठी Dynamic AMOLED 2X स्क्रीन, MediaTek Dimensity 9500 प्रोसेसर, Galaxy AI फीचर्स आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी ही या टॅबलेटची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. काम, अभ्यास तसेच मनोरंजनासाठी टॅबलेट वापरणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन हे टॅबलेट सादर केले आहेत.

Galaxy Tab S12 Ultraचे फीचर्स

यामध्ये 14.6 इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले मिळतो. स्क्रीनचे रेझोल्यूशन 2960 x 1848 पिक्सल्स असून 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,600 निट्सची पीक ब्राइटनेस दिली आहे. त्यामुळे व्हिडीओ पाहण्यासोबतच S Penच्या माध्यमातून काम करतानाही स्क्रीनचा अनुभव अधिक सुरळीत मिळण्याचा दावा कंपनीने केला आहे.

S12+ चे फीचर्स

Galaxy Tab S12+ मध्ये 12.6 इंचांचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचे रिझोल्यूशन 2800 x 1752 पिक्सेल असून, 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट आहे. Ultra मॉडेलच्या तुलनेत याची स्क्रीन लहान असली, तरी डिस्प्लेच्या अनेक प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये फारसा फरक नाही. दोन्ही टॅबलेटमध्ये MediaTek Dimensity 9500 प्रोसेसर देण्यात आला आहे.

11,600mAh पर्यंतची बॅटरी

Galaxy Tab S12 Ultra मध्ये 11,600mAh क्षमतेची बॅटरी, तर S12+ मध्ये 10,600mAh बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही टॅबलेटमध्ये 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, S12 Ultra तब्बल 23 तासांपर्यंत, तर S12+ 21 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक देऊ शकतो.

सॉफ्टवेअर आणि अपडेट्स

हे टॅब्लेट Android 17 वर आधारित One UI 9 वर चालतात. यामध्ये 'Galaxy AI' फीचर्स, मल्टी-विंडो सपोर्ट आणि बॉक्समध्ये मोफत S Pen मिळतो. कंपनीने या डिव्हाइससाठी तब्बल 7 वर्षांपर्यंत OS आणि सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे.

किंमत किती?

Galaxy Tab S12 Ultra ची सुरुवातीची किंमत 1,399 डॉलर, तर Galaxy Tab S12+ ची सुरुवातीची किंमत 1,199 डॉलर ठेवण्यात आली आहे. भारतातील किंमत आणि उपलब्धतेबाबत अद्याप माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. जागतिक बाजारपेठेत या दोन्ही टॅबची विक्री 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT