स्टोमॅटा म्हणजे पानांच्या खालच्या बाजूला असणारी सूक्ष्म रंध्र होय. स्टोमॅटा हे दोन अर्धचंद्राकार संरक्षक पेशींद्वारे आच्छादलेले असतात. त्यांचे काम स्टोमॅटाची रुंदी कमी-जास्त करण्याचे असते.
प्रकाश संश्लेषणाच्या स्टोमॅटा म्हणजे पानांच्या खालच्या बाजूला असणारी सूक्ष्म रंध्र होय. स्टोमॅटा हे दोन प्रक्रियेदरम्यान वनस्पती काही घटक पानांमार्फत घेतात. त्यातील काही घटक हे वायूरुपात असतात, काही द्रवरुपात असतात, तर काही ऊर्जेच्या रुपात असतात.
म्हणजेच कार्बन डाय ऑक्साईड, पाणी आणि सूर्यप्रकाश पानांद्वारे घेतला जातो. या घटकांच्या देवाणघेवाणीदरम्यान या स्टोमॅटाचा वापर होत असतो. सूर्यप्रकाशात या गार्ड सेल्स प्रसरण पावतात जेणेकरून रंध्र मोठी होतात. त्यामुळे कार्बन डाय ऑक्साईड पानामध्ये सर्वत्र पसरतो.
जो प्रकाश संश्लेषणासाठी अत्यावश्यक असतो. रात्रीच्या वेळी म्हणजे प्रकाश नसताना गार्ड सेल्स म्हणजेच संरक्षक पेशी या आकुंचन पावलेल्या असतात.
त्यावेळी प्रकाश संश्लेषण होत नसते. स्टोमॅटा उघडल्यामुळे केवळ कार्बन डाय ऑक्साईडच पानात सर्व पसरत नाही, तर पानांमधून पाण्याची वाफदेखील बाहेर पडत असते.