कस्तुरी

Beauty Tips : ‘केशरी’ सौंदर्य

मोहन कारंडे

– प्रियांका जाधव

आपल्या त्वचेची काळजी आपण घेत असतो त्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो; पण नैसर्गिक उपायांनी आपल्या त्वचेची काळजी घेतल्यास अपाय होण्यापेक्षा ती जास्त उजळ दिसू शकते. केशर यासाठी उत्तम पर्याय आहे.

उजळपणा : दुधात केशर घालून संपूर्ण चेहर्‍याला हे मिश्रण हळूवारपणे लावा. अर्धा तास तसेच ठेवा त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. त्यामुळे आपली त्वचा उजळ आणि तेजस्वी दिसेल. केशराचा रंग दुधात उतरण्यासाठी केशर घालून दूध उकळवा आणि गार करून ते मिश्रण लावा.

तारुण्यपिटिका कमी करते : केशरामध्ये जंतूचा संसर्ग रोखण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवरील डाग आणि मुरुमांचा त्रास कमी होऊ शकतो. तुळशीची पाने, केशर यांचे बारीक मिश्रण करून चेहर्‍याला लावा. हे मिश्रण नियमितपणे चेहर्‍याला लावल्यास तारुण्यपिटिका कमी होतात आणि त्याचे डागही जातात.

काळी वर्तुळे कमी होतात : केशराच्या काही काड्या रात्रभर पाण्यात भिजत घाला. सकाळी त्यामध्ये खोबरेल तेल घाला. हे मिश्रण डोळ्याखालील काळ्या वर्तुळांवर लावा आणि मसाज करा. नियमितपणे डोळ्याखाली हे मिश्रण लावल्यास काळी वर्तुळे कमी होतात.

त्वचेचा रंग आणि पोत सुधारतो : चेहर्‍याला स्क्रबिंग केल्यानंतर गुलाब पाण्यात केशराच्या काड्या घालून ते पाणी चेहर्‍यावर लावा. त्यामुळे चेहर्‍याच्या त्वचेचा पोत सुधारतो. हे मिश्रण तयार करून बाटलीत भरून फ्रीजमध्येही ठेवता येईल.

केस गळणे कमी : दूध, ज्येष्ठमध आणि केशर एकत्र करा. हे मिश्रण केसांच्या मुळाशी डोक्याच्या त्वचेवर लावा. त्यामुळे केसांना मजबुती मिळते. तसेच केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांची चांगली वाढ होते.

सन टॅन : सूर्याच्या प्रखर किरणांमुळे आपली त्वचा काळवंडते. अनेकदा त्याचे चट्टे आपल्या त्वचेवर पडतात. अशा त्वचेवर केशर, चंदन आणि दूध यांचे मिश्रण करून ही पेस्ट डाग असणार्‍या ठिकाणी लावावी. वाळल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT