Gen z fake Wedding Trends AI Photo
फीचर्स

Gen z fake Wedding Trends: दारात मांडव, लगीनघाई अन् पंगती... पण नवरा-नवरीच नाही! 'जेन-झी'मध्ये का वाढतोय 'फेक वेडिंग'चा ट्रेंड

'जेन-झी' म्हणजेच आजच्या तरुण पिढीत लग्नाशी संबंधित एक वेगळाच ट्रेंड व्हायरल होत आहे. नवरदेव आणि नवरीशिवाय पार पडणाऱ्या या सोहळ्याची सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा आहे.

मोहन कारंडे

Gen z fake Wedding Trends

नवी दिल्ली: "लग्न कधी करणार?" आजकालच्या तरुण-तरुणींना सर्वाधिक विचारला जाणारा आणि डोकेदुखी ठरणारा हा प्रश्न! एकीकडे नातेवाईकांच्या या प्रश्नामुळे तरुण वर्ग त्रस्त असताना, दुसरीकडे 'जेन-झी' म्हणजेच आजच्या तरुण पिढीत लग्नाशी संबंधित एक वेगळाच ट्रेंड व्हायरल होत आहे. या ट्रेंडचे नाव आहे 'फेक वेडिंग'. नवरदेव आणि नवरीशिवाय पार पडणाऱ्या या सोहळ्याची सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा आहे. नेमका काय आहे हा भन्नाट प्रकार आणि तरुणाई यामध्ये का रमतेय, जाणून घेऊया.

नक्की काय आहे ही 'फेक वेडिंग'?

तुम्ही आजवर अनेक लग्नसोहळ्यांमध्ये गेला असेल, पण ज्या लग्नात नवरदेव अन् नवरीच नाहीत, अशा सोहळ्याचा कधी अनुभव घेतलाय का? ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण सध्या हाच प्रकार ट्रेण्डिंग आहे. 'फेक वेडिंग'मध्ये खऱ्या लग्नाप्रमाणेच सर्व कार्यक्रम, सजावट आणि जेवणाच्या पंगती उठतात. फक्त यात लग्नाचे मुख्य आकर्षण म्हणजेच नवरदेव आणि नवरी नसतात!

तरुण मंडळी अशा खोट्या लग्नांमध्ये एकत्र येतात, संगीताच्या तालावर थिरकतात, चविष्ट पदार्थांवर ताव मारतात आणि सोहळ्याचा पुरेपूर आनंद लुटतात. सध्या हा ट्रेंड इतका वेगाने लोकप्रिय होत आहे की, फॅशन आणि डिजिटल कंटेंटच्या जगात याचा एक मोठा व्यवसायच तयार झाला आहे.

'फेक वेडिंग' लोकप्रिय होण्याचे कारण काय?

लग्नाचा कोणताही ताण नाही

या सोहळ्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणताही मानसिक किंवा सामाजिक दबाव नसतो. कोणतेही जोडपे नसल्यामुळे कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा तुलना होण्याचा प्रश्नच येत नाही. कोणालाही कसलीही तमा न बाळगता थेट या पार्ट्यांमध्ये सहभागी होता येते.

नातेवाईकांची कटकट नाही

अशा सोहळ्यांमध्ये नातेवाईक नसतात. सहसा तरुण मंडळी नातेवाईकांच्या चौकस प्रश्नांना टाळण्यासाठी खऱ्या लग्नांना जाणे नाकारतात. पण इथे कुटुंब किंवा नातेवाईकांचे कसलेही बंधन नसल्याने तरुण-तरुणी मनमोकळेपणाने एकत्र येतात.

नटण्या-थटण्याची संधी

तुम्हाला जर पारंपरिक पोशाख परिधान करून नटण्या-थटण्याची प्रचंड आवड असेल, तर आता कोणा मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या लग्नाची वाट पाहण्याची गरज उरलेली नाही. 'फेक वेडिंग'च्या माध्यमातून तरुण वर्ग हवी तेव्हा आपली नटण्याची हौस अगदी सहज पूर्ण करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT