Ganesh Utsav 2023 : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून गणेश उत्सवचा प्रारंभ झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जय घोषात श्री गणेश मूर्तींची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या आगमनाने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नवचैतन्य निर्माण झाले आहे. गणरायांच्या आगमनाने नवीन आशा, नवी उमेद, प्रसन्नता निर्माण झाली आहे. सर्वत्र गणेश उत्सवचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. मिरवणुकांमध्ये गुलालाची उधळण करण्यात आली. दांडपट्टा लेझिम, सारखे शिवकालीन मर्दानी खेळ खेळण्यात आले. तसेच डी.जे. लेझर शो मोठ्या प्रमाणात लावण्यात आले. श्री गणेशाच्या आरतीने गणेश पूजन केले जाते. तसेच गणपतीच्या आरतीसह श्री शनिदेवाची आरती आरती ही गणेश चतुर्थी उत्सव काळातील पुजेत म्हटली जाते.
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
सूर्यसुता शनिमूर्ती | तुझी अगाध कीर्ति
एकमुखे काय वर्णू | शेषा न चले स्फुर्ती || जय || १ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
नवग्रहांमाजी श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा
ज्यावरी कृपा करिसी | होय रंकाचा राजा || जय || २ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
विक्रमासारिखा हो | शतकर्ता पुण्यराशी
गर्व धरिता शिक्षा केली | बहु छळीयेले त्यासी || जय || ३ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
शंकराच्या वरदानें | गर्व रावणाने केला
साडेसाती येतां त्यासी | समूळ नाशासी नेला || जय || ४ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
प्रत्यक्ष गुरुनाथ | चमत्कार दावियेला
नेऊनि शुळापाशी | पुन्हा सन्मान केला || जय || ५ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
ऐसे गुण किती गाऊ | धणी न पुरे गातां
कृपा करि दिनावरी | महाराजा समर्था || जय || ६ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
दोन्ही कर जोडनियां | रुक्मालीन सदा पायी
प्रसाद हाची मागे | उदय काळ सौख्यदावी || जय || ७ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
हेही वाचलंत का?