Diptyque's Spiral Coil Controversy pudhari
फीचर्स

Diptyque's Spiral Coil Controversy: कॉपी करावी पण कशाची... प्राडा नंतर आता 'कासव छाप'वरून राडा; शाहरूखशी आहे कनेक्शन?

Anirudha Sankpal

Diptyque's Spiral Coil Controversy: कोल्हापुरी चप्पल प्रकरणावरून प्राडाची जागतिक किरकिरी झाल्यानंतर आता शाहरूख खानचा परफ्युम ब्रँड Diptyque भारतीयांच्या रडारवर आला आहे. पॅरिस बेस या परफ्युम ब्रँडने बाजारात एक लिमिटेड एडिशन समर प्रोडक्ट लाँच केले आहेत. त्यावरून आता भारतीय या ब्रँडची खिल्ली उडवत आहेत.

Diptyque's ची वादग्रस्त सुगंधी अगरबत्ती

Diptyque's ने एक स्पारयर सुंगधी अगरबत्ती लाँच केली आहे. मात्र ही अगरबत्ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. Diptyque's ने ही समर लिमिटेड एडिशन अगरबत्ती लाँच केली आहे त्यात लेमन ग्रास सेंट असेलली ही कासव छाप अगरबत्ती तब्बल ४५ युरोला मिळते. म्हणजे भारतीय रूपयात याची किंमत तब्बल ५००० रूपये इतकी होते. या जागतिक ब्रँडने या अगरबत्तीचे एक उत्तम दर्जाचा सुवास देणारी अगरबत्ती असं ब्रँडिंग केलं असलं तरी भारतीयांनी मात्र सोशल मीडियावर या अगरबत्तीचा कचरा करून टाकला आहे.

ब्रँडच्या अधिकृत वेबसाईटनुसार Citronnelle Incense ही स्पायरल शेप कॉईलमध्ये येते. याद्वारे तुम्ही दुर्गंधी दूर करू शकता. यामध्ये लेमनग्रास, व्हर्बेना आणि नेरोली या घटकांचा समावेश आहे. ही अगरबत्ती वातावरण शांत करण्यासाठी वापरू शकता असं याचं ब्रँडिग करण्यात आलं आहे.

या अगरबत्तीच्या पाकिटात सहा कॉईल मिळणार आहेत. तसेच एक डेकोरेटिव्ह स्टँड देखील त्यासोबत असणार आहे. या अगरबत्तीचा वापर तुम्ही आऊट डोअर गॅदरिंगवेळी आणि गार्डन स्पेससाठी करू शकता.

भारतीय झाले नॉस्टेल्जिक

मात्र या पॅरिसमधील महागड्या ब्रँडने लाँच केलेल्या अगरबत्तीकडे पाहिल्या पाहिल्या प्रत्येक भारतीयाला एकाचीच आठवण झाली. ती म्हणजे डास पळवून लावण्यासाठी सामान्य मध्यमवर्गीय घरात वापरली जाणारी कसवा छाप अगरबत्ती. यानंतर सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पडला.

फॅशन क्षेत्रातील जाणकार साबिया यांनी हा प्रोडक्टचा फोटो सोशल मीडियावर टाकला आणि तुम्ही हे खरेदी करणार का असं विचारलं. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. काहींनी अरे ही तर आमची कासव छाप अगरबत्ती आहे. ही खूप स्वस्त मिळत होती.' ही प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावर असणाऱ्या दुकानात सहत पाच पन्नास रुपयाला मिळत होती.

भारताला क्रेडिट का नाही?

काहींनी हे महागडे लक्झुरी ब्रँड्स प्रत्येक सामान्य घरात दररोज वापरण्यात येणाऱ्या वस्तूंसारख्या दिसणारे प्रोडक्ट बाजारात का आणत आहेत असा प्रश्न विचारला. अनेकांनी मला Diptyque ब्रँड आवडतो. मात्र हा नवा प्रोडक्ट आमचे डास देखील घेणार नाहीत.'

काही युजर्सनी कुठे केले ते मेड इन इंडियाचे पोलीस असा खोचक सवाल देखील विचारला. एका युजरने तर 'आता मी चपातीचा तवा जर्मन लोकांना आणि फ्रेंच लोकांना बिडी विकणार आहे. शेवटी मला माझी देणी भागवायची आहेत.' अशी चेष्टा देखील केली.

काहींनी Diptyque's ला तुम्ही भारताला याचं क्रेडिट का देत नाही असा प्रश्न विचारला. ते आमच्या प्रसिद्ध गोष्टींची अशी कॉपी करू शकत नाही असंही एका नेटकऱ्याने म्हटलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT