जळगाव : दारूच्या नशेत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून त्यानंतर स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना जळगाव तालुक्यातील बोरनार येथे मंगळवारी (दि. 19) घडली.
बोरनार येथील प्लॉट एरिया येथे आनंदा महारू धनगर (42) पत्नी रेखा व दोन मुलांसह वास्तव्यास होते. मंगळवारी (दि. 19) सकाळी 6 वाजता किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. या भांडणात पती आनंदाने पत्नी रेखा धनगर हिच्यावर लोखंडी कुऱ्हाडीने वार केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेखा धनगर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पत्नीवर हल्ला केल्यानंतर आनंदा धनगर यांनी (दि. 19) सकाळी 7 वाजता म्हसावद रेल्वे गेटजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेत जीवनयात्रा संपवली आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पती-पत्नीतील वाद टोकाला गेल्याने घडलेली ही आत्मघातकी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.