टोकाचं पाऊल File Photo
क्राईम डायरी

Thane | टोकाचं पाऊल ! युवतीनं घेतलं उंदीर मारण्याचे औषध; तरुणावर गुन्हा

14 दिवस सुरू होती तरुणीची मृत्यूशी झुंज

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : जीवनभर साथ देण्याच्या शपथा घेऊन प्रियकराने आपल्या गावी जाऊन दुसर्‍या मुलीशी लग्न केल्याने 22 वर्षीय प्रेयसी तरुणीला बसलेल्या धक्क्याने तसेच मानसिक तणावाखाली तरुणीने आपल्याच प्रियकरासमोर उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात 14 दिवसांनी सदर तरुणीची मृत्यूशी झुंज संपली. दरम्यान, मृतक तरुणीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मयत तरुणी रत्नागिरी येथील मूळ रहिवासी असून ती गेल्या काही वर्षांपासून दिवा परिसरात बहिणीकडे राहत आहे. त्या 22 वर्षीय तरुणीचे चार वर्षांपासून दिव्यात राहणार्‍या महेश नामक तरुणाबरोबर प्रेमसंबंध सुरू होते. याचदरम्यान त्याने अचानक गावी जाऊन दुसर्‍या मुलीशी लग्न केल्याने ती तरुणी मानसिक तणावाखाली होती. 1 जून रोजी ती तरुणी सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर न जेवताच झोपी गेले. तसेच दुसर्‍या दिवशी सात वाजण्याच्या सदर तरुणीने बहिणीला फोन करून महेश याच्या घराबाहेरच विषप्राशन केल्याचे सांगितले. तिला उपचारार्थ दिव्यातील खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तिने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याचे सांगितले.

मेलीस तरी चालेल, पण लग्न करणार नाही...

याबाबत त्या तरुणीला विचारणा केले असता, तिचे महेश याच्यासोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू आहे. तसेच गावी जाऊन त्याने दुसर्‍या मुलीची लग्न केले. तसेच त्याने तिला भेटून तिच्याशी लग्न करणार नसल्याचे सांगितल्यावर रात्रीपासून ती तरुणी मानसिक तणावाखाली होती. तसेच सकाळी पाच वाजता त्याच्या घरी जाऊन त्याला लग्न करणार का याबाबत विचारणा केले असता, त्याने तिला लग्न करणार नाही. तेव्हा तिने त्याला विचारले, मी काय करू तेव्हा तो बोलला की तू मेलीस तरी चालेल. पण तो तिच्याशी लग्न करणार नाही असे सांगितले. याच रागात त्या तरुणाच्यासमोरच तिने विषप्राशन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT