ग्राहक आणि तृतीयपंथीयात क्षुल्लक कारणावरून असा काही राडा झाला की, भररस्त्यात कोयता हातात घेऊन असलेला तृतीयपंंथीय Pudhari News Network
क्राईम डायरी

Prostitute's Den Nashik | देहविक्रीयचा अड्डा ! त्र्यंबकनाका येथे मध्यरात्री तृतीयपंथीयाचा पोलिसांसमोर राडा

कोयता काढला : ग्राहकासोबतचा वाद टोकला, देहविक्रीय महिलांकडूनही शिवीगाळ

पुढारी वृत्तसेवा

  • त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ देहविक्रीय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांचा अड्डा

  • ग्राहक आणि तृतीयपंथीयात राडा : तृतीयपंथीयाने कोयताच काढला

  • वेश्या व्यवसायातून वाद : मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

नाशिक : शहराचा स्मार्टरोड म्हणून ओळखला जाणारा त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ देहविक्रीय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांचा अड्डा बनला आहे. गुरुवारी (दि. २४) रात्रीच्या सुमारास ग्राहक आणि तृतीयपंथीयात क्षुल्लक कारणावरून असा काही राडा झाला की, तृतीयपंथीयाने चक्क कोयता काढला. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार पोलिसांसमक्ष झाला. तृतीयपंथी आणि देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहक यांनी पोलिसांसमोरच एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहिली. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत असून, याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी (दि.24) रात्री १२ वाजेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. वेश्या व्यवसायातून हा वाद झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणातील चौघांना अटक केली आहे. त्र्यंबक नाक्यावरील पिनॅकल मॉलसमोरील एचपी पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. याप्रकरणी पोलिस शिपाई राजेंद्र नाकाेडे यांनी मुंंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित प्रणव विनोद शेवाळे (२३, रा. सिडको, नाशिक), चिराग दिनेश वानखेडे (२०, रा. फुलेनगर, पंचवटी), आकांक्षा साहेबराव सकवर (१९, रा. फुलेनगर, पंचवटी) आणि बॉबी बजरंग गुंजाळ (१९) अशी अटक करण्यात आलेल्या दाेन्ही गटांतील संशयितांची नावे आहेत. संशयित शेवाळे, वानखेडे यांच्यासह इतर संशयित त्र्यंबक नाका येथे रात्री मद्यधुंद अवस्थेत आले. त्यातच, दाेन्ही गटांतील वाद टोकाला गेल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. भरस्त्यात हाणामारी सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी एका तृतीयपंथीयाने कोयता काढल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

रात्री तृतीयपंथीयांचा वावर

शहरातील सिटी सेंटर मॉल परिसर, त्र्यंबक नाका परिसर, गडकरी चौक, सीबीएस सिग्नल या भागात दररोज रात्री ९ ते मध्यरात्रीपर्यंत तृतीयपंथीय आणि देहविक्री करणाऱ्या महिलांचा मोठा वावर असताे. या सगळ्याप्रकारामुळे तीर्थक्षेत्र, अध्यात्मिक शहर अशी ओळख असलेल्या नाशिकच्या शांततेला आणि इभ्रतीला नख लागत असून, पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT