नाशिक : राहुल धोत्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी माजी नगरसेवक उद्धव निमसे यांची शनिवारी (दि.२०) पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता दि. १ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
उद्धव निमसे यांची रवानगी शनिवारी शनिवारी (दि.२०) सायंकाळी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. उद्धव निमसे पोलिसांना शरण आल्यानंतर त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सद्यस्थितीला या घटनेत १३ आरोपी आहेत, त्यापैकी नऊ आरोपी मध्यवर्ती कारागृहात आहेत. सचिन दहिया, हेमराज गायकवाड, प्रमोद शिंदे व समाधान माळोदे हे आरोपी अद्यापही फरार आहे.