प्रातिनिधिक छायाचित्र  Pudhari File Photo
क्राईम डायरी

Nashik Murder News : दगडाने ठेचून 38 वर्षीय युवकाचा निर्घृण खून

इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

इंदिरानगर ( नाशिक ) : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडाने ठेचून एका 38 वर्षीय युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून झालेल्या युवकाचे नाव संतोष उर्फ छोटू काळे (रा. इंदिरा गांधी वसाहत क्र. 1, लेखा नगर, सिडको, नाशिक) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.11) संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास संतोष काळे घरातून बाहेर पडला होता. मात्र तो उशिरापर्यंत घरी परतला नाही. मुलगा परत न आल्याने वडिलांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता गरवारे बस स्टॉप परिसरात संतोष काळे रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. वैद्यकीय अधिकारी यांनी तो मृत अवस्थेत असल्याचे सांगितले.

प्राथमिक चौकशीत दोन अज्ञात इसमांनी दगडाने वार करून त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच उप पोलीस आयुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, गुन्हे शाखा-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज व इतर पुरावे तपासले जात असून या घटनेमुळे इंदिरानगर परिसरासह नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT