जानोरी : आदिवासी शेतकऱ्यांना वारस नोंदींचे आमिष दाखवून दीड लाख रुपयांना गंडा घातल्याच्या दाखल गुन्ह्यात न्यायालयाने तोतया पत्रकार संदीप अवधूत याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे.
सुकापूर (ता. कळवण) येथील सुभाष सोमा बागूल यांना शेतजमिनीच्या वारस नोंदीचे काम करून देण्यासाठी अवधूत याने दीड लाख रुपये घेत कामही न केल्याची फिर्याद बागूल यांनी दिली आहे. यावरून अवधूत याच्या विरोधात अभोणा ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दिंडोरी तहसील कार्यालय परिसरात अभोणा पोलिसांनी अवधूत याच्या सिनेस्टाईल मुसक्या आवळल्यानंतर अटक करून कळवण न्यायालयात उभे केले.
फिर्यादी पक्ष व बचाव पक्ष यांचा दोन्ही बाजूचा युक्तिवाद व तपास अधिकारी यांच्या मागणीनुसार अवधूत याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, अभोण्यासह सुरगाणा ठाण्यातही अवधूत यांच्याविरोधात फसवणुकीच्या तक्रारी सुरूच आहेत.