Nashik Fraud News | तोतया पत्रकार संदीप अवधूत विरोधात पुन्हा फसवणुकीची तक्रार दाखल

तोतया पत्रकार संदीप अवधूत विरोधात कळवण सुरगाणा नंतर वणी पोलिसातही फसवणुकीची तक्रार
संदीप अवधुत  तोतया पत्रकार
संदीप अवधुत तोतया पत्रकारpudhari news network
Published on
Updated on
वणी : अनिल गांगुर्डे

संदीप अवधुत या तोतया पत्रकार असणाऱ्याने अनेकांची फसवणुक करणाऱ्या "लखोबा लोंखंडे" वर अभोणा पोलिस ठाण्यापाठोपाठ वणी पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्रकार तर कधी वकील असल्याचे भासवून कळवण तालुका, दिंडोरी तालुक्यातील आदिवासी भागातील आदिवासी बांधवांची फसवणुक करणारा संदिप अवधुत याच्यावर वणी पोलीस ठाण्यात फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभोणा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्हात जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेले अटकपूर्व जामीन देखील फेटाळण्यात आला आहे. पोलीसांकडे आणखी काही तक्रारी येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

वणी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याबद्दल माहिती अशी की, अनुदानातुन ट्रॅक्टर घेण्याचे अमिष दाखवून एका शेतकऱ्याला ९१,५०० रूपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी फसविणाऱ्या संदिप अवधुत विरोधात दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथील गणेश उर्फ बाळू यशवंत गवळी यांच्या तक्रारीवरून वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गवळी यांना आदिवासी विकास भवन नाशिक येथे ओळख असल्याचे भासवून अनुदान व कमी पैशात ट्रॅक्टर मिळवून देतो. योजनेचा फायदा करून देत ओळख वाढवली. गवळी यांच्याकडे पिकअप असून ते वाहतुकीचा व्यावसाय करतात. संदिप अवधुत याने वणी पत्र्याची टपरी शेगावला घेऊन जाण्यासाठी १८,००० रूपये भाडे ठरवुन पलायन केले व तेथून आल्यावर नंतर पैसे देण्याचे खोटे आश्वासन दिले. त्यानंतर अवधुत हा वारंवार आश्वासन देत राहिला. त्यानंतर काही दिवसांनी अवधुत याने वणी येथील के आर टी काॕलेज येथे उपस्थित राहून आपली आदीवासी विकास भवन येथील मोठ्या अधिकाऱ्यांची ओळख असून आदीवासी विकास भवनातुन कमी किंमतीत सबसिडीमध्ये ट्रॅक्टर घेऊन देण्याचे आश्वासन दिले. सबसिडीवर ट्रॅक्टर घेण्यासाठी अर्ज सुटले असुन ते भरण्या साठी पन्नास हजार रूपये भरायचे असल्याचे सांगुन आदिवासी बांधवांकडून पैसे घेतले. अर्ज आणून त्यावर सर्वांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. परंतु पैसे हाती आल्यावर अवधुत आलाच नाही शिवाय फोनवर संपर्क करुन तुमचे काम लवकरच होईल असे खोटे आश्वासन दिले.

संदीप अवधुत  तोतया पत्रकार
संदीप अवधुत हा फोन पे द्वारे पैसे जमा करत होताpudhari news network

अवधुत याच्या मोबाईलवर फोन पे द्वारे १० हजार कल्याण कोटांबे यांनी टाकले. त्यानंतर ३,५०० रुपये दिल्यानंतर काम शेवटच्या टप्प्यात आहे असे सांगुन ओमकार शिंदे यांच्या फोनपेवर दहा हजार रूपये टाकायला सांगीतले. त्यानुसार तक्रारदाराने २३,५०० रुपये टाकले. असे एकूण ९१,५०० रूपये दिल्याचे गवळी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मात्र तक्रारदाराने पैशांची मागणी केली असता अवधुत याने खोटे कारणे सांगुन टाळाटाळ केली. गवळी यांचा वाहतूक व्यावसाय असून त्याद्वारे त्यांचा प्रपंच चालवला जात आहे. अवधुत यांच्या फसवणुकीमुळे अनेकजण अडचणीत आले आहे. याबाबत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक सुनिल पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

संदिप अवधुत कोण?

पत्रकार असल्याचे सांगुन तर काही ठिकाणी वकिल असल्याचे सांगून दिंडोरी, सुरगाणा, कळवण आदी तालुक्यातील आदिवासी भागातील लोकांना फसवणुक करणारा तोतया पत्रकार आहे. जमिनीचे वाद, आदिवासी योजनांची खोटी माहीती देऊन त्या-त्या भागातील एक दोन जणांशी मैत्री करून घरोब्याचे संबंध निर्माण केले जातात. संबंधित व्यक्तीला काहीतरी आमिष दाखवून जाळ्यात ओढुन आर्थिक फसवणुक करत होता. अनेक ठिकाणी सरकारी, निमसरकारी कार्यालयात जाऊन काही तरी त्रुटींवर दाखले देत पत्रकार असल्याचा धाक दाखवून त्रास देत होता. कोणाच्याही प्रकरणात विनाकारण हस्तक्षेप करणारा, एस टी बस ग्रामीण रुग्णालयात अनेक ग्रामपंचायत कार्यालयात विना कारण त्रास देणारा, अभोणा येथील पोलीस ठाण्यात पाठोपाठ वणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असणारा तसेच "तो मी नव्हेच "या नाटकातील लखोबा लोखंडे या पात्रा प्रमाणेच वर्तणुक असलेला संदिप अवधुत अटक पूर्व जामिन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने अभोणा पोलिस त्याचा शोध घेत आहे. अवधुत याच्यावर आणखी काही फसवणुकीचे गुन्हे बाहेर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news