नाशिक : एकाने विवाहितेकडे पैशांच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करीत तिला मारहाण करीत जातिवाचक शिवीगाळ व विनयभंग केल्याची संतापजनक घटना नांदूर गावाजवळ घडली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संशयित इरफान कुरेशी (४०, रा. देवळाली गाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (दि. २१) रात्री ९ ते मध्यरात्री 1.30 दरम्यान संशयित इरफानने पीडितेला अडवत उसनवार दिलेल्या पैशांचा विषय काढला. तसेच त्यावरून पैशांच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी केली. त्याला तिने विरोध केला असता, त्याने तिला मारहण करीत जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच शरीरसंबंध न ठेवल्यास मुलीला उचलून नेत तसेच पीडितेसह तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर इरफानने पीडितेचे कपडे फाडून विनयभंग केला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
आडगाव शिवारातील दत्तनगर येथे गुरुवारी (दि. २२) दुपारी 1.30 च्या सुमारास संशयित प्रदीप ढाकणे (२५, रा. जालना) व त्याच्या मित्राने शिवीगाळ, मारहाण करीत विनयभंग केल्याची फिर्याद पीडितेने दिली. संशयितांनी चाकूचा धाकही दाखवल्याचे तिने म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.