Nashik Crime News Pudhari News Network
क्राईम डायरी

Nashik Crime : नाशिकमध्ये गुन्हेगारी फोफावली ! दररोज सर्वसामान्यांची होतेय लूटमार

17 दिवसात 16 जबरी चोरीचे गुन्हे

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मागील काही दिवसांपासून चोरटे सक्रीय झाले असून, शहरात दररोज त्यांना सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहेत. १ ते १७ जुलै या कालावधीत तब्बल १६ जबरी चोरीच्या घटना समोर आल्या असून, पोलिसांचा धाक उरला की नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. निर्जन ठिकाणाहून जाताना नागरिकांना टार्गेट केले जात आहे. त्यांच्याकडील मुद्देमाल हिसकावला जात आहेच, शिवाय मारहाणही केली जात आहे. याप्रकरणी पोलिस दप्तरी नोंद होत असली तरी, प्रत्यक्षात चोरटे पोलिसांपासून कोसोदूर राहत आहेत.

गेल्या काही दिवसांत जबरी चाेरीचे प्रकार घडल्याचा घटना अलिकडे वाढता वाढता वाढतच आहेत. १ जुलै ते १७ जुलैपर्यंत शहरातील काही ठराविक पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतच या घटना घडल्या आहेत. जबरी चाेरीत सराईत चाेरटे वेगवेगळा पँटर्न वापरत असून कधी दुचाकी तर कधी पायी आणि माेपेडवरुन येत पादचारी व दुचाकीस्वारांना लक्ष करत आहेत. त्यानुसार, जबरी चाेरीचे जास्तीचे गुन्हे इंदिरानगर, नाशिकराेड, पंचवटी, अंबड, म्हसरुळ, आडगाव, सरकारवाडा आणि सातपूर येथे घडले आहेत. बहुतांश गुन्हे पाेलीस ठाण्यात नाेंद असून काही गुन्ह्यांत संशयितांना अटक करण्यात आली आहे. पण, रस्त्याने जातांना काही फेरीवाले, स्थानिक, शेतकरी, परगावाहून आलेले नागरिक व स्थानिक विक्रेते पुरते दहशतीखाली आले आहेत. त्यामुळे हा धाक कमी करण्यासाठी पाेलिसांनी सराईत स्नॅचरवर कठाेर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नाशिकमधील विभागनिहास गुन्ह्याची नाेंद अशी...

  • इंदिरानगर- ४

  • नाशिकराेड- २

  • पंचवटी- २

  • अंबड- २

  • म्हसरुळ- १

  • आडगाव- १

  • भद्रकाली- १

  • सातपूर-१

    Nashik Latest News

चेनस्नॅचर्सही सुसाट

जबरी चोरीप्रमाणेच चेनस्नॅचर्सचीही महिलांमध्ये दहशत बघावयास मिळत आहे. रस्त्याने जाणाऱ्या महिला तसेच वयोवृद्धांना हे चेनस्नॅचर्स टार्गेट करीत आहेत. यातील काही संशयित अनेक दिवसांपासून पसार आहेत. साेने वितळवून त्यांनी दागिन्यांची विक्री केल्याचेही समाेर आले आहे. त्यामुळे या स्वरुपाच्या गुन्हेउकलीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT