Bhandup Minor Death Mystery Solved Mumbai Police
मुंबई : भांडुप येथे सोळा वर्षांच्या मुलीची हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी मृत मुलीच्या सोळा वर्षांच्या अल्पवयीन मित्राविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मुलगा अल्पवयीन असल्याने बालसुधारगृहात रवाना
मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले. प्रपोज केल्यानंतर मुलीने नकार दिल्याने त्याने त्याच्या मैत्रिणीला इमारतीच्या तिसाव्या मजल्यावरुन धक्का दिला होता. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना २४ जूनला सायंकाळी सात वाजता भांडुप येथी महेंद्र स्पेलंडर
अस घडलं ....
इमारतीच्या डी विंगच्या पाण्याच्या टाकीजवळ घडली. सोळा वर्षांची ही मुलगी मुलुंड येथे राहत असून तिचा आरोपी मित्र आहे. ते दोघेही एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या चांगले परिचित आहेत. २४ जून रोजी ती आरोपीला भेटण्यासाठी त्याच्या इमारतीजवळ आली होती.
यावेळी त्याने तिला त्याच्या घरी न नेता ३२ व्या मजल्यावरील टेरेसवर नेले. तिथे आरोपी मुलाला परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तसेच त्याला शाळेतील मुले चिडवत असल्याने ती नाराज असल्याचे सांगितले. याच दरम्यान त्याने तिला प्रपोज केले. यावेळी त्याच्यासोबत डेटींग करण्याची ऑफर दिली होती. मात्र तिने त्याला सरळसरळ नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात त्याने तिला जोरात धक्का दिला. त्यात ती तिसाव्या मजल्यावरुन खाली पडली. सुरुवातीला तिने जीवनयात्रा संपवली असावी, असे तपास करणाऱ्या पोलिसांना वाटले होते. त्यामुळे भांडुप पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन याप्रकरणाचा तपास सुरु केला होता.
सीसीटिव्ही फुटेजवरुन प्रकरण उघडकीस
सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन आरोपी मुलाची पोलिसांनी कसून चौकशी केली होती. या चौकशीतून हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर सोमवारी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत ताब्यात घेतल्यानंतर त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.