मुंबई : म्हाडाचा एकच फ्लॅट आठ जणांना दाखवत त्यांची दिड कोर्टीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही फसवणूक केल्याप्रकरणी तुषार साटम ऊर्फ राजू, किरण बोडके आणि अशोक इंगोले या तिघांविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संशयित तिघांनी अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता असून याचा पोलीस तपास करत आहेत. यातील तक्रारदार महिला मालाड परिसरात राहते. तिला गोरेगाव येथील पहाडी, म्हाडा इमारतीमधील एक फ्लॅट दाखविला होता. हा फ्लॅट अक्षय चव्हाण याच्या मालकीचा असून त्याला ४७ लाखांमध्ये फ्लॅटची विक्री करायची असल्याचे सांगितले.
ठरल्याप्रमाणे तिने त्यांना टप्याटप्याने ३४ लाख रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी तिला फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा कागदपत्रे दिली नव्हती. विचारणा केल्यानंतर ते तिघेही तिला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने त्यांच्याविषयी चौकशी केली असता या तिघांनी इतर सातजणांसोबत त्याच फ्लॅटचा व्यवहार विक्री करायची असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे तिने त्यांना टप्याटप्याने ३४ लाख रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी तिला फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा कागदपत्रे दिली नव्हती. विचारणा केल्यानंतर ते तिघेही तिला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने त्यांच्याविषयी चौकशी केली असता या तिघांनी इतर सातजणांसोबत त्याच फ्लॅटचा व्यवहार केल्याचे समजले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याने तक्रार दाखल केली होती.
सातजणांसह तक्रारदार महिलेकडून आरोपींनी १ कोटी ४७ लाख ७५ हजार रुपये घेतले होते. मात्र कोणालाही फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच आरोपीविरुद्ध गारेगाव पोलिसांत तक्रार केली होती.