BSNL Launches New Satellite Phone pudhari
फीचर्स

BSNL Launches New Satellite Phone: बीएसएनएलने लाँच केला सामान्यांसाठी सॅटेलाईट फोन; किंमत किती अन् कसा करायचा अर्ज?

Anirudha Sankpal

BSNL Launches New Satellite Phone: जिथं मोबाईल नेटवर्क देखील पोहचत नाही तिथं देखील आता तुम्ही फोनवर बोलू शकता. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने भारतात नवीन सॅटेलाईट फोन लाँच केला आहे. मात्र हा काही साधा सुधा स्मार्टफोन नाहीये. हा फोन अशा ठिकाणांसाठी बनवला आहे जिथं मोबाईल टॉवर नेटवर्क पोहचू शकत नाही. तसेच आपत्कालीन परिस्थितीत संपूर्ण नेटवर्क डाऊन असतं त्यावेळी बीएसएनएलचा हा सॅटेलाईट फोन संपर्काचे एक महत्वाचे साधन बनेल.

या सॅटेलाईट फोनची किंमत ही १ लाख ३४ हजार ठेवण्यात आली आहे. प्रथमदर्शनी या फोनची किंमत जास्त वाटत असली तरी त्याची उपयुक्तता आणि दुर्गम भागात देखील कार्यक्षम राहण्याची गुणवत्ता पाहता तिथं तुमचा महागडा आयफोन देखील कुचकामी ठरतो तिथं हा बीएसएनएलचा सॅटेलाईट फोन उपयुक्त ठरतो.

या सॅटेलाईट फोनची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे हा मोबाईल टॉवरवर अवलंबून रहात नाही. नॉर्मल फोनला कॉल करण्यासाठी तुमचा फोन हा मोबाईल टॉवरशी जोडला जाणे गरजेचे असते. मात्र सॅटेलाईट फोन थेट ऑर्बिटमध्ये असलेल्या सॅटेलाईटशी कनेक्ट होते. यामुळंच दऱ्या खोऱ्यात, जंगलात, समुद्रात अत्यंत दुर्गम भागात या सॅटेलाईट मोबाईलद्वारे सहज संपर्क साधता येतो.

कोणती कागदपत्रे लागणार?

बीएसएनएल देशात अनेक वर्षापासून सॅटेलाईट फोन सर्व्हिस (GSPS) सेवा देत आहे. आता बीएसएनएल हे सामान्य ग्राहकांसाठी आणि संस्थांसाठी नवीन सॅटेलाईट हँडसेट बाजारात आणला आहे.

सरकारच्या नियमानुसार ही सर्व्हिस घेणाऱ्यांना सामान्य मोबाईल कनेक्शन प्रमाणे आपले ओळख आणि कागदपत्रे द्यावी लागतील. त्याचबरोबर या फोनचा वापर कुठं आणि किती वेळेसाठी कोणत्या उद्येशासाठी केला जाणार आहे याची देखील माहिती द्यावी लागेल.

कोणासाठी जास्त उपयुक्त?

हा फोन अँड्रोयड स्मार्टफोनसारखा नाहीये. यात टचस्क्रीन, सोशल मीडिया अॅप, व्हिडिओ स्ट्रीमिंग किंवा हाय स्पीड इंटरनेट सारख्या अद्यावत फिचर्स मिळणार नाहीत. या फोनचा मुख्य उद्येश हा कामाच्यावेळी विश्वासार्ह व्हॉईस कॉलिंग एसएमएस सेवा उपलब्ध करून देणं हा आहे. ज्यावेळी मोबाईलचे नेटवर्क पूर्णपणे गायब होते त्यावेळी हा फोन तुमच्या कामाला येईल.

त्यामुळेच याचा वापर हा आपत्ती व्यवस्थापन, बचाव कार्य, सुरक्षा एजन्सी, खाण, तेल आणि गॅस सेक्टरमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती, समुद्रात वावर असणाऱ्या व्यक्ती तसेच अती दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी जास्त प्रमाणात होतो.

फक्त फोन घेऊन चालणार नाही

या फोनची किंमत ही जवळपास १.३४ लाख रूपये आहे. मात्र फक्त फोन खरेदी करून काम भागणार नाही तर यासाठी बीएसएनएलचा सॅटेलाईट सर्व्हिस प्लॅन देखील घ्यावा लागणार आहे. या प्लॅनचे मंथली रेंटल आणि कॉल चार्जेस देखील सामान्य टेलिकॉम सर्व्हिसपेक्षा वेगळ्या आहेत. याचे रेट हे सरकार आणि व्यावसायिक कस्टमर्ससाठी वेगवेगळे प्लॅन आहेत.

अनेकाच्या मते या अत्यंत बेसिक सॅटेलाईट फोनची गरज काय. तर याचे उत्तर दोन्ही फोनचं तंत्रज्ञान संपूर्ण वेगळं आहे. काही स्मार्ट फोन हे फक्त अमर्जन्सी मेसेज पाठवण्यासाठी सॅटेलाईट सुविधा देते. मात्र बीएसएनएल थेट सॅटेलाईट नेटवर्कद्वारे सामान्य कॉल आणि एसएमएस सुविधा देते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT