भूमिपुत्र

तूर पिकावरील मारुका अळ्ळीचा प्रादुर्भाव कसा रोखाल?

backup backup

सद्यस्थितीत तूर पिकावर (tur crop) काही ठिकाणी मारुका या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर्षी चांगले पाऊसमान असल्यामुळे तुरीचे पीक चांगले आहे व हे पीक फुलोरा अवस्थेत येत आहे. शेतकरी बंधूंना तूर पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, मागील पंधरवड्यातील असणारे पावसाळी वातावरण, तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील मारुका अळीच्या वाढीस पोषक आहे व अशा वातावरणामुळे तूर पिकाला (tur crop) मारुका अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवश्यक आहे.

मारुका (Maruca vetrata) ही कडधान्य पिकावरील पाने गुंडाळणारी व शेंगा पोखरणारी कीड आहे. या किडीचा पतंग करड्या रंगाचा असून मागील पंखावर पांढरे पट्टे आढळून येतात. मादी पतंग कळ्या, फुले व शेंगावर अंडी घालतात. अळी पांढुरक्या रंगाची व अर्धपारदर्शक असते. तिच्या पाठीवर काळ्या रंगाच्या सहा ठिपक्यांच्या जोड्या असतात. अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना एकत्रित करून जाळ्याने चिटकून झुपके तयार करून त्या आतमध्ये राहून कळ्या, फुले खाते. तिसर्‍या व चौथ्या अवस्थेतील अळी शेंगा पोखरून आतील दाणे खाते. अळी शेंगांच्या झुपक्यात किंवा माती मध्ये कोषावस्थेत जाते. या किडीचा जीवनक्रम 18 ते 35 दिवसांत पूर्ण होतो. किडीच्या व्यवस्थापनासाठी जिथे तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. तेथे सर्वेक्षण करून शेतात 20 ते 25 ठिकाणी प्रतिमीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास गरजेनुसार खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकची फवारणी करावी.

  • फ्लूबेंडामाईड 20 डब्ल्यूजी 6 ग्रॅम किंवा
  • थायोडीकार्ब 75 डब्ल्यू.पी 20 ग्रॅम किंवा
  • नोवलुरोन 5.25 + इंडोक्झाकार्ब 4.50 एससी 16 मिली

वरीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पॉवरस्प्रेने फवारणी करावी. दुसर-या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाची मात्र तिप्पट करावी. गरज भासल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसर्‍या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकांची अदलाबदल करावी. उपरोक्त कीटकनाशकांसोबत इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, संप्रेरके, खते, अन्नद्रव्ये इत्यादी मिसळू नये. सदर कीटकनाशकांच्या शिफारशी या तदर्थ स्वरूपाच्या असून शेतकरी बंधूंना तत्काळ नियंत्रणाच्या द़ृष्टीने प्रसारित करण्यात येत आहेत. शेतकरी बंधूंनी फवारणी करताना संरक्षक किटचा वापर करावा.

हे ही पहा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT