TATA CNG Cars: ‘टाटा’च्या ‘या’ दोन CNG कारचे प्री-बुकींग सुरू! 
ऑटोमोबाईल

TATA CNG Cars: ‘टाटा’च्या ‘या’ दोन CNG कारचे प्री-बुकींग सुरू!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने त्यांच्या दोन लोकप्रिय कारचे सीएनजी प्रकार लॉन्च करण्याची घोषणा केली होती, ज्याची तयारी कंपनीने पूर्ण केली आहे. (TATA CNG Cars)

Tata Motors चे Tiago आणि Tigor चे CNG व्हेरियंट टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा स्पॉट झाले होते, त्यानंतर या कार्सच्या लॉन्च ऑटो तज्ज्ञांनी विविध शक्यता वर्तवल्या होत्या. त्यानंतर आता टाटा मोटर्सने अधिकृतपणे या दोन्ही कारचे प्री बुकिंग सुरू केले आहे. कंपनीने सुरू केलेली प्री-बुकिंग प्रक्रिया देशातील प्रमुख मेट्रो शहरांमधील निवडक डीलर्सकडे ५ ते १० हजार रुपयांपर्यंतच्या टोकन रकमेसह सुरू झाली आहे. कंपनीने टाटा टिगोर सीएनजी आणि टाटा टियागो सीएनजीच्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु असे मानले जाते की या सीएनजी कारची किंमत सध्याच्या कारपेक्षा ५० हजार ते १ लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते. (TATA CNG Cars)

सध्याच्या Tata Tiago च्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीने या कारमध्ये 1199 cc चे 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे जे 86 PS पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड AMT गियरबॉक्स अशा दोन प्रकारात ही कार उपलब्ध आहे. टाटा टिगोरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, यात 1199 cc चे 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 86 PS पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. रिपोर्ट्सनुसार, या दोन्ही कारमध्ये कंपनी 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह 1.0-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड इंजिन देखील देऊ शकते. भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेत लॉन्च केल्यानंतर, टाटा टियागो (CNG) आणि टाटा टिगोर (CNG) यांची मारुतीच्या वॅगनआर, अल्टो, सेलेरियो आणि ह्युंदाईच्या ग्रँड i10 तसेच सॅन्ट्रोशी स्पर्धा होण्याची अपेक्षा आहे. (TATA CNG Cars)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT