KTM RC 160 2026 file photo
ऑटोमोबाईल

KTM RC 160 दोन नवीन रंगांत लाँच; किंमत किती? आणि काय आहे खास?

KTM RC 160 new colors: केटीएम कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपल्या लोकप्रिय RC 160 या मॉडेलला नव्या रंगात लॉंच केले आहे.

मोहन कारंडे

KTM RC 160 2026

मुंबई: केटीएम कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपल्या लोकप्रिय RC 160 या मॉडेलला नव्या रंगात सादर केले आहे. विशेष म्हणजे, लूक अधिक आकर्षक झाला असला तरी कंपनीने बाईकच्या किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. यापूर्वी ही बाईक केवळ एका 'काळा' रंगात उपलब्ध होती. आता ग्राहकांना दोन नवीन पर्यायांची निवड करता येईल.

KTM RC 160 2026: नवे कोरे रंग आणि डिझाइन

इलेक्ट्रॉनिक ऑरेंज मॅट: हा केटीएमचा सिग्नेचर लूक आहे. यामध्ये ऑरेंज बेससह काळ्या रंगाचे ग्राफिक्स आणि काळे अलॉय व्हील्स मिळतात. बाईकची फ्रेम देखील लक्षवेधी ऑरेंज रंगात आहे.

सिरेमिक व्हाईट मॅट: ज्यांना क्लासिक लूक आवडतो त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. पांढऱ्या बेसवर काळ्या आणि केशरी रंगाचे ग्राफिक्स असून, याचे व्हिल मात्र केशरी रंगात देण्यात आली आहेत.

KTM RC 160 2026: दमदार इंजिन आणि परफॉर्मन्स

KTM RC 160 मध्ये 164.2cc क्षमतेचे सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे.

  • पॉवर: 18.73 bhp

  • टॉर्क: 15.5 Nm

  • गिअरबॉक्स: 6-स्पीड (स्लिपर क्लच सुविधेसह)

KTM RC 160 2026: किंमत किती?

नवीन रंगांच्या समावेशानंतरही या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.85 लाख रुपये इतकीच कायम ठेवण्यात आली आहे. नवीन रंगांच्या मोटारसायकली आधीच शोरूममध्ये येण्यास सुरुवात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT