TATA Motors Security: टाटा कंपनीच्या गाड्यांबाबत इंडियन कॉम्पुटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम अर्थात CERT-In ने एक मोठी वॉर्निंग दिली आहे. त्यांनी टाटा मोटर्सच्या गाड्या या कंपनीच्या कनेक्टेड व्हेएकल अॅपशी जोडल्या गेल्या आहेत. टाटा आपल्या गाड्यांमध्ये iRA 2.0 आणि iRA.ev सारखे कनेक्टेड अॅप वापरतात त्यात मोठ्या त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींचा फायदा उचलून हॅकर्स सहज टाटा कारच्या सुरक्षेत छेद करू शकतात.
सरकारी एजन्सीने याबाबत एक हाय सिक्युरिटी लेवल वॉर्निंग दिली आहे. एजन्सीच्या मते या त्रुटीचा फायदा उचलून हॅकर्स महत्वाचे क्रेडेंशियल्स किंवा गाडीबाबतची सर्व माहिती आणि सर्व्हिसेस तसेच अॅक्सेस मिळवू शकतात. एजन्सीने हॅकर्स या त्रुटीचा कसा फायदा उचलू शकतात हे सांगितलं.
iRA 2.0 हे टाटा च्या पेट्रोल आणि डिझेल गाड्यांशी संबंधित आहे. तर iRA.ev याचा संबंध हा इलेक्ट्रिक गाड्यांशी आहे. सरकारी एजन्सी CERT-in यांनी iRA.2.0 चे २६.७३ व्हर्जन त्याच्या खालचे सर्व व्हर्जन साठी हा इशारा दिला आहे. तर iRA.ev च्या २६.७२ आणि त्याच्या खालच्या सर्व व्हर्जनमध्ये ही त्रुटी आढळून आली आहे.
एजन्सीने ग्राहकांना त्यांच्या गाडीचे सॉफ्टवेअर अपडेट करण्याचा सल्ला दिला. या अॅप बाबत बोलायचं झालं तर याचा वापर करून गाडीसाठी स्मार्टफोन एक रिमोटमध्ये बदलता येतो. याचा वापर करून युजर कारचे लोकेशन ट्रॅक करू शकतात. गाडीचे हेल्थ तपासू शकतात. ट्रीप पाहू शकतात तसेच इंधन किंवा बॅटरी हेल्थ देखील तपासली जाऊ शकते.
एवढेच नाही तर याचा वापर करून रिमोट कमांड देऊन गाडीचा दरवाजा देखील लॉक करता येतो. जर हॅकर तुमच्या गाडीचा एक्सेस मिळवतो तर तो फक्त गाडीची माहितीच मिळवत नाही तर त्याचे फिचर देखील रिमोटली एक्सेस करू शकतो. गरज लागल्यास तो तुमच्या गाडीचा दरवाजे उघडू किंवा बंद करू शकतो.
एकूण या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स संवेदनशील माहिती, युजर्सची ओळख आणि अॅप्लिकेशन डेटामध्ये बदल देखील करू शकतो. कनेक्टेड कारच्या बाबतीत हॅकिंगची प्रकरणे वाढत आहेत. नुकतेच युरोपात मोठ्या प्रमाणात मॉलचे फ्रीज हॅक केले गेले होते. २०१६ मध्ये रिसर्चरने सांगितलं होतं की जवळपास १० कोटी फॉक्सवॅगन कार रिमोटली अनलॉक केल्या जाऊ शकतात.
अशा परिस्थिती तुम्ही जर टाटाची गाडी वापरत असाल तर तुम्ही आपले कनेक्टेड फीचर्स अपडेट करायला हवे असा सल्ला सरकारी एजन्सीने दिला आहे. अनेक युजर्सना कार इन्फोटेनमेंट सिस्टम अपडेट करण्याचे लक्षात रहात नाही. मात्र हीच चूक हॅकर्सना तुमच्या कारचा थेट एक्सेस देऊन जाते.