Satara News : खून, पुराव्‍यासाठी सोशल मीडियाचा टाटा-बाय

डायल ११२ करा : तंत्रज्ञानाचा मिळतोय चांगला सल्‍ला
social media
social mediaPudhari
Published on: 
Updated on: 
विठ्ठल हेंद्रे

सातारा : 'खून कसा करावा? पुरावे नष्ट करण्यासाठी काय करावे? कशी खबरदारी घ्यावी?' असे सोशल मीडियाला विचारले तर 'मी मार्ग सांगू शकत नाही, तुम्‍ही पोलिसांना डायल ११२ वर संपर्क करा,' असा तंत्रज्ञानाचा सल्‍ला मिळत आहे. याद्वारे सोशल मीडिया खून व पुरावे नष्ट करण्याबाबत टाटा-बाय-बाय करत आहे.

सध्या सोशल मीडियाचा हौशे, गवशे, नवशे सर्वजणच वापर करत आहेत. सोशल मीडियामुळे अनेकांची फसवणूक झाली आहे. गुन्‍हेगारी वृत्ती असणार्‍यांकडून 'आपला कसा वट आहे,' हे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या स्‍टाईलने रील्‍स बनवून दहशत माजवण्याचा प्रयत्‍न केला जातो. आयुष्यामध्ये रागात, तणावात असल्‍यास अनेक भलते-सलते प्रश्न देखील सोशल मीडियावर विचारले जातात.

सोशल मीडिया अशा अपप्रवृत्ती असणार्‍या घटनांना थारा देत नाही. सोशल मीडिया अशा भानगडींना खतपाणी घालत नाही. उलट सोशल मीडियाकडून अनेक चांगल्‍या प्रकारची उत्तरे मिळत आहे. सोशल मीडियाचे तंत्रज्ञान त्‍याबाबत 'पोलिसांना कळवा', असा सल्‍ला देत आहे. सोशल मीडियावर आत्‍महत्‍येबाबत देखील काही प्रश्‍न विचारले तर त्‍याबाबत देखील प्रवृत्त न करता अपप्रवृत्त केले जात आहे. 'तुम्‍ही एकटे राहू नका. विश्वासू व्‍यक्‍तीला लगेच बोला. औषधे, शस्‍त्र, उंच जागापाहून दूर रहा. टेले मानसवर संपर्क करा,' असे सल्‍ले सोशल मीडियावर दिले जात आहेत.

एआय चॅट जीपीटी, यूट्यूब, गुगल

सोशल मीडियामध्ये प्रामुख्याने सध्या एआय चॅट जीपीटी बूम आहे. याशिवाय यूट्यूब व गुगल देखील आहे. या सोशल मीडियावर खून कसा करावा, खूनाचे पुरावे कसे नष्ट करावेत, असे प्रश्न विचारल्‍यास ते त्‍याबाबत साफ नकार देत असल्‍याचे समोर आले आहे. 'तुम्‍ही रागात असाल तर काय घडले आहे सांगा. मी परिस्‍थिती हिंसाचाराशिवाय हाताळण्यासाठी मदत करतो,' असे सोशल मीडियावर उत्तर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news