Vastu Tips In Marathi Canva
ज्योतिष आणि धार्मिक

Vastu Tips In Marathi | सायंकाळी 'या' वस्तू दान केल्यास येते दारिद्र; वास्तुशास्त्रातील या नियमाचे जाणून घ्या कारण

Vastu Tips In Marathi | हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रात दानाला मोठं महत्त्व आहे. मात्र दान करण्याची वेळ आणि वस्तू याबाबत काही नियम दिले गेले आहेत.

shreya kulkarni

Vastu Tips In Marathi:


हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रात दानाला मोठं महत्त्व आहे. मात्र दान करण्याची वेळ आणि वस्तू याबाबत काही नियम दिले गेले आहेत. शास्त्रांनुसार सूर्यास्तानंतर काही गोष्टी दान केल्याने घरात दारिद्र येतं, सुख-शांती नष्ट होते आणि आर्थिक अडचणी वाढतात. त्यामुळे जरी कोणी जवळचं किंवा खास व्यक्ती असली, तरी सायंकाळच्या वेळेस या गोष्टी दान करू नयेत.

शामच्या वेळेस ‘या’ गोष्टी कधीच दान करू नका:

1. संध्याकाळी मीठ दान करणे टाळा

शास्त्रांनुसार संध्याकाळी मीठ दान केल्याने व्यक्तीच्या यशात अडथळे येतात. करिअर, व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती थांबते. फॅमिलीमध्ये तणाव वाढू शकतो. कोणी मीठ मागितलं तरीही संध्याकाळी देऊ नका.

2. सुई दान करू नये

संध्याकाळी सुई कोणालाही देऊ नये किंवा दान करू नये. यामुळे घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात आणि खर्च वाढतो. हे आर्थिक स्थैर्यासाठी अपशकुन मानले जाते.

3. धन किंवा पैसे दान न करणे

संध्याकाळी पैसे दान केल्याने किंवा उधार दिल्याने लक्ष्मीमातेचा कोप होतो. फिनान्शियल लॉसेस होतात आणि घरात धनलाभ थांबतो. सूर्यास्तानंतर पैशांचे व्यवहार टाळावेत.

4. तुळशीचं दान करू नये

तुळशीच्या झाडात लक्ष्मीचे वास्तव्य असते. त्यामुळे सूर्यास्तानंतर तुळशीचा स्पर्श, दान किंवा पाणी देणं वर्ज्य आहे. अशाने दरिद्रतेचे योग येतात.

5. दही किंवा हळदीचं दान नको

संध्याकाळी दही दान केल्याने शुक्र ग्रह कमजोर होतो आणि घरात सुख-समृद्धी कमी होते. याशिवाय, हलदीचं दान केल्यास गुरु ग्रह प्रभावित होतो, ज्याचा परिणाम विवाह, नोकरी आणि ज्ञानावर होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT