प्रतीकात्मक छायाचित्र. 
ज्योतिष आणि धार्मिक

surya guru gochar 2026 | गुरु-सूर्याचा 'नवपंचम राजयोग' बदलणार 'या' राशींचे नशीब; नोकरीत बढती अन् व्यवसायात भरभराट!

surya guru gochar 2026 |५ मार्च रोजी मिथुन राशीतील गुरु आणि कुंभ राशीतील सूर्य एकमेकांशी कोनीय स्थिती बनवून 'नवपंचम राजयोग' निर्माण करणार

पुढारी वृत्तसेवा

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रहाला ज्ञान, भाग्य, धन, शिक्षण आणि संतान सुखाचा कारक मानले जाते. जेव्हा गुरूच्या स्थितीत बदल होतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो.

surya guru gochar 2026

मुंबई : होळीनंतर ५ मार्च रोजी मिथुन राशीत असलेला गुरु आणि कुंभ राशीत असलेला सूर्य एकमेकांशी कोनीय स्थिती बनवून 'नवपंचम राजयोग' निर्माण करणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रहाला ज्ञान, भाग्य, धन, शिक्षण आणि संतान सुखाचा कारक मानले जाते. जेव्हा गुरूच्या स्थितीत बदल होतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो. सध्या गुरु मिथुन राशीत असून तो कुंभेतील सूर्यासोबत नवपंचम योग करत आहे. याचा विशेष लाभ खालील तीन राशींना मिळणार आहे.

मेष

मेष राशीच्‍या जातकांसाठी 'नवपंचम राजयोग' असेल खास

मेष राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अतिशय खास असेल. घरात सुख-शांती नांदेल. मुलांशी संबंधित असलेल्या समस्या दूर होतील आणि त्यांच्याकडून आनंदाची बातमी मिळेल. तुम्ही दीर्घकाळापासून करत असलेल्या कष्टाचे फळ मिळेल. पदोन्नती आणि पगारवाढीचे योग आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल आणि स्पर्धकांवर मात करता येईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ उत्तम असेल.

कन्या

कन्‍या राशीच्‍या जातकांसाठी प्रगतीचा काळ

नवपंचम राजयोग हा कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा ठरेल. नोकरीत अचानक लाभ मिळू शकतो. तुमच्या कामाचे कौतुक होईल, ज्यामुळे मान-सन्मान वाढेल. व्यवसायात रखडलेले मोठे व्यवहार पूर्ण होऊ शकतात. आर्थिक परिस्‍थिती सकारात्‍मक असली तरी चैनीच्या वस्तूंवर खर्चही वाढेल. कर्ज सहज मंजूर होऊ शकेल. जोडीदाराशी असलेले नाते घट्ट होईल. आरोग्य चांगले राहील.

मिथुन

मिथुन राशीच्‍या जातकांना नोकरीच्‍या नवीन संधी

या राशीत स्वतः गुरु विराजमान असल्याने हा राजयोग मिथुन राशीसाठी अत्यंत शुभ ठरेल. नोकरीत यशाचे प्रबळ योग आहेत. नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. वरिष्ठाचे मागदर्शन लाभेल. पदोन्नतीची संधी. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. कामात तुमची कामगिरी उत्तम राहील. उत्पन्नात वाढ होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही उत्साही आणि ऊर्जेने भरलेले अनुभवाल.

टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT