Sun Transit in Pisces Surya Rashi Parivartan Trigrahi Yoga March 2026
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य एका ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याला आत्मा, पिता, आरोग्य, मान-सन्मान आणि प्रशासकीय क्षमतेचा कारक मानले जाते. सध्या सूर्य आपल्या शत्रू राशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. मात्र, १५ मार्च २०२६ रोजी सूर्य आपला मित्र गुरूच्या राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे.
या ठिकाणी सूर्य, शुक्र आणि शनी यांची युती होऊन 'त्रिग्रही योग' आणि 'शुक्रादित्य राजयोग' निर्माण होत आहे. द्रिक पंचांगानुसार, १५ मार्च रोजी मध्यरात्री १:०८ वाजता हा बदल होईल आणि सूर्य १४ एप्रिल २०२६ पर्यंत याच राशीत राहील. सुर्याच्या त्रिग्रही योगाचा सकारात्मक प्रभाव तीन राशींवर पडणार आहे. या ३ राशी खालीलप्रमाणे आहेत.
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ करिअरमध्ये सुवर्णसंधी घेऊन येईल. दशम भावात होणारे हे गोचर प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या कामांमध्ये यश मिळवून देईल. नोकरीत बढती, व्यवसायात नफा आणि शत्रूंवर विजय. भौतिक सुखात वाढ होईल आणि महत्त्वाच्या प्रवासांतून आर्थिक लाभ घडतील.
कर्क राशीच्या नवव्या भावात सूर्याचा प्रवेश होत असल्याने या जातकांना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ असून उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. वैवाहिक आयुष्यातील कडू आठवणी संपून गोडवा निर्माण होईल.
धनु राशीच्या चतुर्थ भावात सूर्याचे भ्रमण होणार आहे. भाग्याचा स्वामी स्वतः सुख स्थानी येत असल्याने जीवनात आनंदाचे वातावरण राहील. नवीन घर, जमीन किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. आईचे सहकार्य लाभेल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.
जर तुम्हाला सूर्याच्या स्थितीचा सकारात्मक परिणाम हवा असेल तर सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी थोडेसे सिंदूर किंवा कुंकू आणि लाल फूल अर्पण करा. "ॐ ह्रीम ह्र सूर्याय नमः" हा मंत्र ११, २१ किंवा १०८ वेळा जप करा. सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी सूर्य चालीसा किंवा आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे देखील फायदेशीर ठरेल.