ज्योतिष आणि धार्मिक

Sun Transit 2026 |सूर्य करणार मीन राशीत प्रवेश; १४ मार्चपासून 'या' राशींसाठी ‘गोल्डन टाइम’, तर काहींनी घ्यावी लागेल काळजी

Sun Transit 2026 | सूर्य साधारणपणे दर महिन्याला राशी बदलतो, चा परिणाम सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो

पुढारी वृत्तसेवा

ज्योतिषशास्त्रात सूर्याचा संबंध आत्मविश्वास, सरकारी कामकाज, करिअर आणि प्रतिष्ठेशी जोडला जातो. त्यामुळे सूर्य जेव्हा राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम नोकरी, आर्थिक स्थिती, नाती आणि आरोग्यावरही दिसून येतो.

Sun Transit in Pisces 2026

मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. आत्मबल, नेतृत्व क्षमता, सन्मान आणि ऊर्जा यांचे प्रतीक म्हणून सूर्य ओळखला जातो. सूर्य साधारणपणे दर महिन्याला राशी बदलतो आणि त्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. ज्योतिषीय गणनेनुसार १४ मार्च २०२६ रोजी रात्री १२ वाजून ४१ मिनिटांनी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीचा स्वामी गुरु (बृहस्पति) असून त्यांना ज्ञान, धर्म आणि सकारात्मकतेचा ग्रह मानले जाते. त्यामुळे सूर्याचा हा गोचर अनेकांच्या जीवनात नवी संधी घेऊन येऊ शकतो. मात्र काही राशींनी या काळात विशेष सावधगिरी बाळगणेही आवश्यक ठरू शकते.

मीन राशीत सूर्याचा गोचर

ज्योतिषशास्त्रात सूर्याचा संबंध आत्मविश्वास, सरकारी कामकाज, करिअर आणि प्रतिष्ठेशी जोडला जातो. त्यामुळे सूर्य जेव्हा राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम नोकरी, आर्थिक स्थिती, नाती आणि आरोग्यावरही दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य सिंह राशीचा स्वामी असून आत्मबल आणि अधिकाराचे प्रतिनिधित्व करतो. सूर्य मीन राशीत प्रवेश करताच तो गुरु ग्रहाच्या ऊर्जेच्या प्रभावाखाली येतो. मीन राशीचा संबंध अध्यात्म, कल्पनाशक्ती आणि भावनिक संतुलनाशी जोडला जातो. त्यामुळे या गोचरकाळात अनेकांमध्ये आध्यात्मिकतेकडे कल वाढू शकतो. तसेच काही राशींना करिअर आणि आर्थिक क्षेत्रात नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेवूया १२ राशींना सूर्याच्या या गोचराचा कोणता परिणाम होणार याविषयी....

मेष

मेष राशींच्‍या जातकांचासाठी चढ-उताराचा काळ

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा चढ-उताराचा राहू शकतो. अपेक्षित परिणाम मिळण्यास विलंब होऊ शकतो. नोकरीत कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. काही जण नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. व्यापारात गुंतवणूक करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी किरकोळ गैरसमज होऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीने पाय किंवा मांड्यांमध्ये वेदना जाणवू शकतात.

वृषभ

वृषभ राशीच्‍या जातकांना सकारात्मक परिणाम मिळणार

वृषभ राशीसाठी हा गोचर सकारात्मक परिणाम देणारा ठरू शकतो. सुखसोयी वाढण्याची शक्यता असून कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. काहींना नवी नोकरी किंवा चांगले पद मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. व्यापारातही लाभ मिळू शकतो. वैवाहिक जीवनात संबंध मधुर राहतील.

मिथुन

मिथुन राशीच्‍या जातकांच्‍या करिअरच्या दृष्टीने अनुकूल काळ

मिथुन राशीसाठी हा गोचर करिअरच्या दृष्टीने अनुकूल ठरू शकतो. कामानिमित्त प्रवास वाढू शकतो आणि त्यातून नवीन संधी मिळू शकतात. नोकरीत मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. पदोन्नती किंवा प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. व्यापारातही लाभाचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती संतुलित राहील आणि उत्पन्नात वाढ होऊ शकते. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी संबंध अधिक मजबूत होतील.

कर्क

कर्क राशींच्‍या जातकांचा राहिल अध्यात्मिक कार्यांकडे कल

कर्क राशीच्या लोकांमध्ये या काळात अध्यात्मिक कार्यांबद्दल अधिक रस वाढू शकतो. काही जण धार्मिक यात्रा किंवा पूजा-अर्चेत सहभागी होऊ शकतात. करिअरमध्ये वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत भाग्य साथ देऊ शकते आणि बचत वाढू शकते. व्यापारासाठीही हा काळ लाभदायक ठरू शकतो. मात्र वडिलांच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण होऊ शकते.

सिंह

सिंह राशींच्‍या जातकांसाठी आव्‍हानात्‍मक काळ

सिंह राशीसाठी हा गोचर थोडा आव्हानात्मक ठरू शकतो. मनात असुरक्षितता किंवा अस्वस्थता जाणवू शकते. नोकरीत कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी समन्वय ठेवणे आवश्यक ठरेल. व्यापारात सावधगिरीने काम करणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी संयमाने वागणे आवश्यक राहील.

कन्या

कन्या राशीच्‍या जातकांच्‍या खर्चावर नियंत्रण ठेवावे

कन्या राशीसाठी हा काळ मिश्र परिणाम देणारा ठरू शकतो. मित्र किंवा जवळच्या व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे. नोकरीत अधिक मेहनत घ्यावी लागू शकते आणि परिणाम मिळण्यास वेळ लागू शकतो. खर्च वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबीय जबाबदाऱ्या वाढू शकतात. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी वाद टाळण्याचा प्रयत्न करावा.

तूळ

तूळ राशींच्‍या जातकांना मिळणार मेहनतीचे फळ

तुला राशीसाठी हा गोचर मेहनतीचे चांगले फळ देणारा ठरू शकतो. अनेक प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे आणि कामात समाधान मिळू शकते. व्यापारात वेग येईल आणि नफा वाढू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. वैयक्तिक आयुष्यात संबंध चांगले राहतील.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्‍या जातकांसाठी करिअरच्या दृष्टीने अनुकूल काळ

वृश्चिक राशीसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने अनुकूल ठरू शकतो. कामाबाबत गंभीरता वाढेल आणि मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. काहींना परदेशाशी संबंधित कामाची संधी मिळू शकते. व्यापारातही लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल आणि बचत वाढू शकते.

धनु

धनु राशीच्‍या जातकांना व्‍यापारात मिळणार लाभ

धनु राशीसाठी हा काळ घर-परिवार आणि सुखसोयींकडे अधिक लक्ष देणारा ठरू शकतो. नोकरीत मेहनतीमुळे पदोन्नती किंवा नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापारातही लाभ मिळू शकतो. आर्थिक बाबतीत भाग्य साथ देईल आणि मालमत्तेत गुंतवणुकीची संधी मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल.

मकर

मकर राशीच्‍या जातकांच्‍या आत्‍मविश्‍वास होणार वाढ

मकर राशीसाठी हा काळ आत्मविश्वास आणि प्रयत्न वाढवणारा ठरू शकतो. कामानिमित्त प्रवास वाढू शकतो. करिअरमध्ये बदलाचे संधी मिळू शकते. व्यापारात नवीन रणनीती फायदेशीर ठरू शकते. आर्थिक बाबतीत मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते आणि उत्पन्न वाढू शकते. वैयक्तिक आयुष्यात संबंध संतुलित राहतील.

कुंभ

कुंभ राशीच्‍या जातकांना आर्थिक लाभाची संधी

कुंभ राशीसाठी हा गोचर आर्थिक बाबतीत सुधारणा घडवून आणणारा ठरू शकतो. नवीन लोकांशी भेट होऊन त्यातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत नवी संधी मिळू शकते. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. व्यापारातील योजना यशस्वी ठरू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि बचत वाढू शकते.

मीन

मीन राशींच्‍या जातकांना जाणवेल आर्थिक तणाव

मीन राशीसाठी हा काळ काही बाबतीत आव्हानात्मक ठरू शकतो. खर्च वाढण्याची शक्यता असून आर्थिक ताण जाणवू शकतो. नोकरीत कामानिमित्त प्रवास वाढू शकतो. काही जण नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात. व्यापारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण चुकीचे निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी समन्वय राखण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागू शकतात.

टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT