प्रतिकात्‍मक छायाचित्र.  Pudhari
ज्योतिष आणि धार्मिक

Surya Gochar 2026 | ११ मे पर्यंत सूर्य शुक्र नक्षत्रात; 'या' राशींचे नशीब पालटणार

सूर्याने भरणी नक्षत्रात प्रवेश केला असून तो ११ मे २०२६ पर्यंत याच नक्षत्रात राहिल

पुढारी वृत्तसेवा

Surya Gochar 2026

सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो, त्यामुळे त्याची प्रत्येक हालचाल ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाची असते. सूर्याचे गोचर (भ्रमण) सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारचे परिणाम घेऊन येते. सध्या सूर्य भरणी नक्षत्रात प्रवेश करत आहे, ज्याचा स्वामी शुक्र ग्रह आहे. हिंदू पंचांगानुसार, २८ एप्रिल २०२६ रोजी सूर्याने भरणी नक्षत्रात प्रवेश केला असून तो ११ मे २०२६ पर्यंत याच नक्षत्रात राहणार आहे. शुक्राच्या नक्षत्रात सूर्याचे हे वास्तव्य काही राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरेल हे जाणून घेवूया...

मेष राशीचे जातक आत्‍मविश्‍वाने पूर्ण करतील कामे

मेष राशी (Aries) शुक्राच्या भरणी नक्षत्रातील सूर्याचे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. प्रत्येक काम पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण कराल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल.तुमचे लव्ह लाईफ सुखद राहणार आहे. बँक बॅलन्स वाढवण्यासाठी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात.समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमची पद-प्रतिष्ठा वाढेल. या काळात आरोग्याची काळजी घ्या आणि अनावश्यक वादात अडकणे टाळा.

सिंह राशीच्‍या जातकांना विशेष लाभ

सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे नक्षत्र गोचर अतिशय लाभदायक ठरेल. व्यापाऱ्यांच्या कामाचे कौतुक होईल आणि व्यवसायात प्रगती होईल. या काळात तुमचा कल धार्मिक कार्यांकडे अधिक राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेषतः शुभ आहे. शैक्षणिक सहलीचे (Educational Trip) योग जुळून येऊ शकतात. तुम्ही उत्साहाने आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल.

धनु राशीच्‍या जातकांना प्रगतीचे दरवाजे उघडणार

धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याचे भरणी नक्षत्रातील भ्रमण प्रगतीचे दरवाजे उघडणारे ठरेल. व्यवसायात एखादी मोठी फायदेशीर डील तुमच्या हाती लागू शकते.कठीण प्रसंगात तुम्हाला तुमच्या मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. प्रोफेशनल लाईफमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. सामाजिक स्तरावर लोकांमध्ये मिसळण्यात आणि नवीन ओळखी निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT