Shukra Gochar 2026
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार वैभवाचा दाता शुक्र लवकरच मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे तीन विशिष्ट राशींच्या व्यक्तींना नोकरी-व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्राला दैत्यांचा गुरू मानले जाते. तसेच तो सौंदर्य, सुख, वैभव, विवाह आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह आहे. ज्याच्या कुंडलीत शुक्र प्रबळ असतो, त्याचे जीवन सर्व सुख-सुविधा आणि लक्झरीने परिपूर्ण असते. सध्या शुक्र आपल्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत विराजमान आहे. मात्र, मार्च महिन्याच्या अखेरीस २६ तारखेला शुक्र मेष राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या या गोचराचा प्रभाव सर्व १२ राशींवर पडणार असला तरी, तीन राशींच्या जातकांसाठी हा काळ विशेष फलदायी ठरणार आहे.
दृक पंचांगानुसार, २६ मार्च रोजी पहाटे ५:१३ वाजता शुक्र मेष राशीत प्रवेश करेल आणि १९ एप्रिलपर्यंत याच राशीत राहील. या काळात शुक्राची सूर्यासोबत युती होऊन 'शुक्रादित्य योग' निर्माण होणार आहे. याचा सर्वाधिक फायदा खालील तीन राशींना होईल.
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर त्यांच्या लग्न भावात होणार आहे. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात कमालीची सुधारणा होईल आणि आकर्षण वाढेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायी आहे. परदेशी कंपनीकडून मोठे प्रोजेक्ट्स मिळण्याची किंवा परदेशवारीची संधी मिळू शकते. आयात-निरीयत व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगला नफा होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल आणि एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जाण्याचे योग आहेत. उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ सकारात्मक आहे.
धनु राशीच्या पाचव्या भावात शुक्राचे गोचर होणार आहे. हा भाव शिक्षण, संतती आणि सर्जनशीलतेशी संबंधित आहे. येथे 'केंद्र त्रिकोण योग' तयार होत आहे. तुमच्या सर्जनशीलतेत वाढ होईल, ज्यामुळे नवीन कल्पना सुचतील. तुमच्या नवीन योजनांमुळे करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते.या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील.: प्रेमसंबंधांसाठी हा काळ अनुकूल असला तरी, वैवाहिक जोडीदारासोबत एखाद्या कारणावरून किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे.
कुंभ राशीच्या गोचर कुंडलीत शुक्र तिसऱ्या भावात प्रवेश करणार आहे. यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.नोकरीत नवीन संधी उपलब्ध होतील आणि पदोन्नतीसह नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे.नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. तुम्हाला प्रचंड धनलाभ होऊ शकतो आणि भविष्यासाठी बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.आरोग्य उत्तम राहील. तुम्ही ऊर्जावान आणि सकारात्मक अनुभवाल. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल.