Shani file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Shani Dev Transit 2027 : २०२७ मध्ये शनिदेवांची कृपादृष्टी! तीन वेळा बदलणार नक्षत्र; 'या' ४ राशींच्या मेहनतीला येणार यश

शनि ग्रह ज्या राशीत किंवा नक्षत्रात स्थित असतो त्याचा प्रभाव दिसून येतो

पुढारी वृत्तसेवा

Shani Dev Transit 2027 : शनि ज्या राशीत किंवा नक्षत्रात स्थित असतो, त्याचा प्रभाव दिसून येतो. सध्या शनि मीन राशीतून भ्रमण करत आहे. शनिचे हे भ्रमण मेष ते मीन अशा सर्व १२ राशींवर परिणाम करेल. सध्या शनि 'उत्तर भाद्रपदा' नक्षत्रातून जात आहे, ज्याचा संबंध शनि ग्रहाशीच मानला जातो. आगामी वर्षात शनि तीन वेळा आपले नक्षत्र बदलेल.

शनिदेव तीनवेळा बदलणार नक्षत्र

फेब्रुवारी २०२७ मध्ये शनिदेव 'रेवती' नक्षत्रात प्रवेश करतील. त्यानंतर जून महिन्यात 'अश्विनी' नक्षत्रात आणि त्यानंतर पुन्हा 'रेवती' नक्षत्रात परत येतील. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध आहे, तर अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतू आहे.ज्‍योतिषशास्त्रानुसार, २०२७ मध्ये शनिच्या नक्षत्र परिवर्तनाचा लाभ प्रामुख्याने ४ राशींना मिळण्याची शक्यता आहे. शनिच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे २०२७ मध्ये कोणत्या राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल, हे जाणून घेऊया.

मकर राशीच्या जातकांना होणार आर्थिक लाभ

मकर राशीच्या लोकांसाठी शनिचे हे नक्षत्र परिवर्तन फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना काही आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. तुमच्या व्यावसायिक प्रयत्नांचे कौतुक केले जाईल.

कुंभ

कुंभ राशीच्या जातकांना मिळेल कष्‍टाचे फळ

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिचे हे नक्षत्र परिवर्तन सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. व्यवसायातील परिस्थिती स्थिर आणि अनुकूल राहील. तुमच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील. तुम्हाला उत्साहाने भरलेले वाटेल आणि तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल.

वृषभ

वृषभ राशीच्या जातकांना मिळणार समाजात मान-सन्मान

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शनीचे नक्षत्रातून होणारे संक्रमण अत्यंत उत्तम ठरेल. भूतकाळाच्या तुलनेत तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळू शकेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल.

तूळ

तूळ राशीच्या जातकांना मिळेल करिअरमध्‍ये यश

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शनीचे नक्षत्रातून होणारे संक्रमण शुभ ठरेल. प्रार्थना किंवा आध्यात्मिक कार्यांमध्ये सहभागी होणे फायदेशीर ठरेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. करिअरमध्ये तुम्हाला यश मिळेल आणि कुटुंबाकडून पाठिंबा प्राप्त होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT