प्रतिकात्‍मक छायाचित्र.  Pudhari
ज्योतिष आणि धार्मिक

Shani Gochar 2027 : २९ वर्षांनंतर शत्रू राशीत शनि गोचर; १३९ दिवस ८ राशींवर होणार धनवर्षाव!

शनि ३ जून २०२७ रोजी मेष राशीत प्रवेश करतील आणि सुमारे १३९ दिवस याच राशीत विराजमान राहतील

पुढारी वृत्तसेवा

Shani Gochar 2027 Aries lucky zodiac signs : आगामी २०२७ या वर्षात शनि याच राशीमध्ये तब्बल २९ वर्षांनंतर गोचर करणार आहेत. २०२७ च्या पूर्वी शनीने एप्रिल १९९८ मध्ये मेष राशीत गोचर केले होते. मेष राशीचे स्वामित्व मंगळ ग्रहाकडे आहे. शनि नेहमीच अशुभ फल प्रदान करतात, असे नाही. शत्रू राशीत शनीच्या प्रवेशामुळे काही राशींना मोठा दिलासा मिळणार आहे. या गोचरच्या आधीपासूनच शनि ८ राशींना सकारात्मक फळे प्रदान करू लागतील. या राशींच्या जातकांना आर्थिक बाबतीत, करिअरमध्ये आणि व्यावसायिक क्षेत्रात घवघवीत यश मिळण्यास सुरुवात होऊ शकते. शनि मेष राशीत प्रवेश केल्यानंतर वक्री होतील, ज्यामुळे शनीचे मीन राशीत पुनरागमन होईल. परंतु, शनीच्या मेष गोचरचा हा काळ म्हणजेच सुमारे १३९ दिवस ८ राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.

३ जून २०२७ रोजी मेष राशीत प्रवेश

शनि ३ जून २०२७ रोजी मेष राशीत प्रवेश करतील आणि सुमारे १३९ दिवस याच राशीत विराजमान राहतील. वक्री गतीमुळे २० ऑक्टोबर २०२७ रोजी शनि पुन्हा मीन राशीत परततील. शनीचे मेष गोचर कोणत्‍या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे ते पाहूया...

मिथुन

मिथुन राशी:

मिथुन राशीच्या जातकांना या काळात आर्थिक विवंचनेपासून मोठा दिलासा मिळू शकतो. या काळात शिस्तीने केलेल्या कामांमुळे यश प्राप्त होईल आणि व्यावसायिक स्थितीत सुधारणा होईल. महत्त्वपूर्ण कामांमध्ये यश मिळण्याचे योग जुळून येत आहेत. एखादी शुभ वार्ता कानी पडेल. नशिबाची पूर्ण साथ लाभेल.

कर्क

कर्क राशी:

कर्क राशीसाठी शनीचे हे राशीपरिवर्तन आर्थिक स्थिती सुधारणारे ठरेल. अडकलेला पैसा परत मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. गुंतवणुकीसाठी उत्तम संधी उपलब्ध होतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा (रिटर्न्स) मिळू शकतो. व्यापारी वर्ग नवीन करार किंवा सौद्यावर सही करण्यामध्ये यशस्वी होईल. महत्त्वाच्या निर्णयांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल असणार आहे.

कन्या

कन्या राशी:

कन्या राशीच्या जातकांची रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती (प्रमोशन) किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची चिन्हे आहेत. सामाजिक मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. नवीन आणि प्रभावशाली व्यक्तींच्या संपर्कात याल.

तूळ

तूळ राशी

तुला राशीच्या जातकांना नशिबाची साथ लाभण्याचे संकेत आहेत. या काळात नोकरीत बदल किंवा एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळण्याचे योग आहेत. उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम संधी प्राप्त होतील. परदेश गमनाचे योग बळावू शकतात. दीर्घकाळापासून रखडलेली कामे आता गती घेतील.

वृश्चिक

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या जातकांना यश प्राप्त करण्यासाठी संयम आणि कठोर परिश्रम कायम ठेवावे लागतील. कामकाज संदर्भातील अडथळे किंवा अडचणी दूर होतील. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होण्याचे संकेत आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नवीन व्यवसाय किंवा नोकरीची सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.

धनु

धनु राशी

धनु राशीच्या जातकांच्या मानसिक ताणतणावात लक्षणीय घट होऊ शकते. या काळात आर्थिक संकटांपासून आराम मिळेल. अडकलेला धनलाभ होण्याचे योग आहेत. व्यापाराची स्थिती मजबूत होईल. जीवनसाथीसोबत उत्तम वेळ घालवाल. कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर ताळमेळ वाढीस लागेल.

मकर राशी:

मकर राशीच्या जातकांची बऱ्याच काळापासून रखडलेली कामे या काळात पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. मानसिक ताण कमी होईल आणि अनिश्चिततेचे वातावरण संपुष्टात येईल. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ झाल्याचा अनुभव येईल. व्यवसायाच्या विस्तारासाठी नवीन संधी प्राप्त होतील.

कुंभ राशी:

शनीच्या मेष गोचरमुळे कुंभ राशीच्या जातकांना साडेसातीपासून तात्पुरती मुक्ती मिळेल. या काळात कार्यातील सर्व अडथळ्यांपासून सुटका होऊ शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक बाजू अधिक मजबूत होईल. कुटुंबाशी संबंधित समस्या हळूहळू समाप्त होतील. तथापि, हा दिलासा केवळ २० ऑक्टोबर २०२७ पर्यंतच राहील. शनि पुन्हा मीन राशीत परतताच साडेसातीचा प्रभाव पुन्हा सुरू होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT