Shani Nakshatra Parivartan 2026 pudhari
ज्योतिष आणि धार्मिक

Shani Nakshatra Parivartan 2026: शनीदेव आज बदलणार आपली चाल... साडेसाती सुरू असलेल्या या राशींच्या लोकांना होणार जबरदस्त लाभ

Anirudha Sankpal

Shani Nakshatra Parivartan 2026: आज २१ मार्च रोजी शनी देव आपली चाल बदलणार आहेत. शनीदेव आज सायंकाळी जवळपास ४ वाजता उत्तराभाद्रपद नक्षत्रच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहेत. इथं शनीदेव १७ एप्रिलपर्यंत राहणार आहेत. या नक्षत्राचे स्वामी हे स्वतः शनी देवच आहेत. ज्योतिष शास्त्र जाणणाऱ्यांच्या मते उत्तर भाद्रपद नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात जाण्यामुळं तीन राशीच्या लोकांना त्याचा जबरदस्त लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीपैकी एका राशीच्या लोकांची शनीची साडेसाती सुरू आहे तर दोन राशींमध्ये शनीचा अडीच वर्षाचा काळ सुरू आहे. त्यामुळं या पद नक्षत्र परिवर्तनाला विशेष महत्व आहे.

सिंह राशी

सिंह राशीवर सध्या शनीचा अडीच वर्षाचा काळ सुरू आहे. उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या तिसऱ्या पदामध्ये शनिदेव प्रवेश करत असल्यामुळं हा काळ तुमच्यासाठी कल्याणकारी राहण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांना या काळात जास्त लाभ होणार आहे. व्यापारात मोठी डील होण्याची शक्यता आहे. शक्तीशाली लोकांशी कनेक्शन निर्माण करण्यात यश मिळेल. कुटुंबात शांतता आणि सौहार्दाचं वातावरण राहील. संतती सुख मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

मेष राशी

मेष राशीसाठी सध्या शनिची साडेसाती सुरू आहे. शनीचे हे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या लोकांना अनेक पातळीवर शुभ लाभ देणारे ठरण्याची शक्यता आहे. जीवनात सुरू असलेल्या सल्वात मोठ्या समस्यांचा अंत होणार आहे. नोकरी आणि व्यवसायासंबंधीच्या गोष्टींमध्ये लाभ मिळणार आहे. जे लो नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांना हा काळ लाभदायक ठरणार आहे. नशीबाची चांगली साथ मिळणार आहे. सुख शांती आणि प्रेमाचं वातावरण तुम्हाला एक वेगळाच आनंद देईल. तुम्ही तणाव आणि चिंतेपासून मुक्त रहाल.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांची देखील शनी ढय्या सुरू आहे. शनी देवांची बदलती चाल गुंतवणुकीच्या बाबतीत काही चांगल्या संधी घेऊन येईल. या काळात गुंतवणूक करणं लाभकारी ठरण्याची शक्यता आहे. कुटुंबात आणि नातेसंबंधात मजबूती येईल. मित्रांच्या सहकाऱ्यामुळं कोणतंतरी मोठं काम पूर्ण होईल. करिअरबाबतचे निर्णय विचारपूर्वक घ्या. जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य लाभेल. आरोग्याची काळजी घेणे आणि संयम हे लाभकारी ठरू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT