Shani Nakshatra Parivartan 2026 : शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे या ३ राशींनी राहावे सावध, मे २०२६ पर्यंत आव्हानांचा काळ File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Shani Nakshatra Parivartan 2026 : शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे या ३ राशींनी राहावे सावध, मे २०२६ पर्यंत आव्हानांचा काळ

शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा 'या' तीन राशींवर काय होणार परिणाम ते जाणून घ्या

पुढारी वृत्तसेवा

Shani Nakshatra Parivartan 2026 saturn constellation change negative impact on these zodiac signs

पुढारी ऑनलाईन :

Shani Nakshatra Parivartan 2026 : आज शनि देव आपल्या स्वतःच्या नक्षत्रात म्हणजेच उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करत आहेत. ज्योतिषशास्त्रात हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शनीचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी विशेष सावधगिरीचा इशारा देणारे ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत.

ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला कर्म, शिस्त आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते. शनी व्यक्तीच्या कर्मांनुसार फळ देतो, म्हणून त्याला कर्मफलदाता असेही म्हटले जाते. शनीची दृष्टी कठोर मानली जाते, पण तीच दृष्टी व्यक्तीला जीवनात संयम, संघर्ष आणि जबाबदारी शिकवते.

जेव्हा शनी अशुभ प्रभावात असतो, तेव्हा जीवनात विलंब, अडथळे, मानसिक तणाव, आर्थिक दबाव आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तर शनी शुभ स्थितीत असला, तर तो व्यक्तीला संयम, अनुभव आणि परिपक्वतेच्या जोरावर उंचीवर पोहोचवतो.

दृक पंचांगानुसार, 20 जानेवारी म्हणजेच आज शनिदेव उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करत आहेत. या नक्षत्राचा अधिपती स्वतः शनी असल्यामुळे हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत शक्तिशाली आणि काही अंशी धोकादायक मानले जात आहे. शनीच्या नक्षत्र बदलामुळे सर्व राशींवर समान परिणाम होणार नाही. काहींसाठी हा बदल दिलासा आणि नव्या आशा घेऊन येईल, तर काही राशींना या काळात अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. त्यामुळे कोणत्या राशींवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडेल, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन थोडा सावधगिरीचा काळ घेऊन येऊ शकते. या काळात आरोग्याशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत चढ-उतार राहतील. खर्च अपेक्षेपेक्षा जास्त वाढू शकतो. छोट्या-छोट्या कारणांवरून वाद किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. घाईघाईने घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात, त्यामुळे कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी नीट विचार करून आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.

सिंह राशी

सिंह राशीच्या जातकांना या बदलामुळे काही काळ कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी अडचणी वाढू शकतात. आर्थिक बाबतीत ताण जाणवू शकतो. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे चिंतेचे कारण बनू शकतात. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये अतिरिक्त जबाबदाऱ्या किंवा विरोध सहन करावा लागू शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते, त्यामुळे दिनचर्या आणि आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ जपून पावले टाकण्याचा संकेत देत आहे. आरोग्य खालावणे किंवा सतत थकवा जाणवू शकतो. अचानक खर्च समोर येऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक नियोजन बिघडू शकते. व्यवसाय किंवा गुंतवणुकीशी संबंधित निर्णय घाईने घेणे नुकसानकारक ठरू शकते. अशा वेळी संयम राखणे आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणे हाच या काळातील योग्य मार्ग मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT