ज्योतिष आणि धार्मिक

Shani Rashifal 2026 : अवघ्या ११ दिवसांत शनी बदलणार आपली चाल; 'या' ३ राशींचे नशीब फळफळणार!

शनी देव १७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी उत्तर भाद्रपद नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करतील

पुढारी वृत्तसेवा

Shani Nakshatra Change 2026

मुंबई : कर्मफलदाता शनी देव सध्या मीन राशीत विराजमान असून उत्तर भाद्रपद नक्षत्रातून भ्रमण करत आहेत. शनीच्या गतीतील बदलांचा परिणाम सर्व १२ राशींच्या जीवनावर होतो. सध्या शनी उत्तर भाद्रपद नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात आहेत. हिंदू पंचांगानुसार, १७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजून ५ मिनिटांनी शनी उत्तर भाद्रपद नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करतील. या नक्षत्र बदलामुळे काही राशींचे नशीब उजळणार असून त्यांच्यासाठी सुवर्णकाळ सुरू होणार आहे. जाणून घेवूया या राशीविषयी..

मेष

मेष राशीच्‍या जातकांच्‍या उत्‍पन्‍नात होईल वाढ

शनीचे हे नक्षत्र संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरेल. उत्पन्नात वाढ होईल आणि समाजात मान-सन्मान वाढेल. वडील आणि गुरूंचे पूर्ण सहकार्य लाभेल. नोकरीतील अडचणी दूर होतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि कुटुंबात सुख-शांती नांदेल. मात्र, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

कन्या

कन्या राशीच्‍या जातक घेतील सकारात्‍मक ऊर्जेचा अनुभव

कन्या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्ही अधिक आत्मविश्वासाने काम कराल आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्याचे कौतुक होईल. न्यायालयीन प्रकरणांत यश मिळेल. जीवनसाथीसोबतचे संबंध मधुर होतील. कामावर लक्ष केंद्रित केल्यास नफ्याचे करार हाती येण्याची शक्यता आहे.

कुंभ

कुंभ राशीच्या जातकांसाठी अनुकूल काळ

कुंभ राशीसाठी शनीचे हे नक्षत्र परिवर्तन शुभ सिद्ध होईल. करिअर आणि आर्थिक आघाडीवर स्थिती उत्तम राहील. व्यापारातील अडथळे हळूहळू दूर होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असून काही चांगली बातमी मिळू शकते. आरोग्यात सुधारणा होईल आणि तुम्ही आपल्या कौशल्याच्या जोरावर सर्व संकटांवर सहज मात कराल.

टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT