प्रातिनिधिक छायाचित्र. 
ज्योतिष आणि धार्मिक

Shani Dev- Budh Margi 2025 : शनि-बुध होणार मार्गी; या राशींसाठी 'गोल्डन टाइम' सुरू!

अचानक धनलाभासह वाहन आणि मालमत्ता प्राप्‍तीचा योग

पुढारी वृत्तसेवा

Shani Dev- Budh Margi 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनि ग्रह आयुष्य, दुःख, रोग, पीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, लोखंड, खनिज तेल, कर्मचारी, सेवक, तुरुंग अशा अनेक गोष्टींचा कारक मानले जातो. बुध ग्रह संवाद, तर्क, बुद्धी, चतुराई आणि मित्रांचा कारक आहे. जेव्हा या दोन्ही ग्रहांच्या चालीत बदल होतो, तेव्हा त्याचा काही राशींवर विशेष प्रभाव पडतो. शनि देव २८ नोव्हेंबर रोजी, तर ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह ३० नोव्हेंबर रोजी मार्गी होतील. या शुभ योगामुळे काही राशींचे भाग्य चमकणार आहे. या राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, वाहन आणि मालमत्तेची प्राप्ती होऊ शकते. जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यवान राशी...

वृषभ

वृषभ राशीच्‍या जातकांना गुंतवणुकीतून मोठा नफा!

वृषभ राशीच्या जातकांसाठी शनि आणि बुधाचे मार्गी होणे अत्यंत लाभदायक ठरू शकते. त्‍यांच्‍या उत्पन्नात वाढ होईल. गुंतवणुकीतून मोठा नफा होण्‍याचा योग आहे. शनिदेव तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या स्थानी मार्गी होत असल्याने, तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तयार होतील. तुम्हाला एखादा नवा प्रकल्प किंवा व्यवसायात मोठा लाभ मिळेल. अचानक धनप्राप्तीचे योग बनत आहेत. तुमच्या बुद्धिमत्ता आणि चातुर्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय योग्य वेळी घेऊ शकाल. गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, बुध ग्रहाच्या प्रभावाने तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून लाभ मिळू शकतो.

मकर

मकर राशीच्‍या जातकांच्‍या मेहनतीला मिळणार यश

मकर राशीच्या व्यक्तींसाठी शनि आणि बुधाचे मार्गी होणे अनुकूल सिद्ध होऊ शकते. शनिदेव तुमच्या राशीतून साहस आणि पराक्रमाच्या स्थानी मार्गी होत आहेत, तर बुध ग्रह तुमच्या राशीच्या ११ व्या भावात (लाभाचे स्थान) सरळ चालेल. यामुळे तुमचे साहस आणि पराक्रम वाढेल, तसेच उत्पन्नात वृद्धीचे योग तयार होतील.या काळात तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि तुम्ही योग्य निर्णय घेण्यास समर्थ असाल.व्यापार किंवा नोकरीमध्ये लाभाचे स्पष्ट संकेत आहेत. आजपर्यंत केलेल्‍या मेहनतीचे फळ मिळेल. मोठ्या लाभाचे मार्ग खुले होतील. कुटुंबात सुख आणि आनंदाचे वातावरण राहील. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

कर्क

कर्क राशीच्‍या जातकांना मिळणार नशिबाची भक्‍कम साथ

कर्क राशीच्या लोकांसाठी शनि आणि बुध देवाचे मार्गी होणे लाभदायक ठरू शकते. शनिदेव तुमच्या राशीतून भाग्य स्थानावर मार्गी होत असल्याने तुम्हाला नशिबाची भक्कम साथ मिळेल. २०२० पासून थांबलेली किंवा अडकलेली कामे आता पूर्ण होतील. तुमचे मानसिक संतुलन व्यवस्थित राहील. कुटुंब आणि सामाजिक जीवनात समाधान अनुभवाल. तुम्‍ही केलेली गुंतवणूक या काळात लाभप्रद सिद्ध होऊ शकते. एखाद्या धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तसेच, देशा-विदेशाचा प्रवास करण्याची संधी मिळू शकते.

टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT