Rahu Mangal Yuti
मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा सर्व १२ राशींवर मोठा प्रभाव पडतो. सध्या शनिदेवाच्या स्वामित्वात असलेल्या कुंभ राशीत राहू ग्रह आहे. लवकरच ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ देखील कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या गोचरामुळे कुंभ राशीत 'राहु-मंगल युती' निर्माण होईल. या युतीचा प्रभाव काही राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकतो, तर ३ विशेष राशींसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा असेल. जाणून घेऊया कोणत्या आहेत भाग्यवान राशी....
कन्या राशीच्या लोकांसाठी मंगल आणि राहुचे हे गोचर अत्यंत शुभ ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायक असून परीक्षे संदर्भात एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत सहलीचा योग येईल आणि नशिबाची पूर्ण साथ लाभेल.
मकर राशीच्या जातकांसाठी हे राशी परिवर्तन फायदेशीर ठरेल. बऱ्याच काळापासून जाणवणारी पैशांची चणचण दूर होईल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रेमजीवनात गोडवा राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी लहान गुंतवणुकीतून भविष्यात चांगल्या परताव्याचे योग आहेत. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ राशीत 'राहु-मंगल ग्रहांची युती' होत आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा असेल.नोकरदारांना मोठी जबाबदारी किंवा पदोन्नती मिळू शकते. आर्थिक आवक वाढण्याचे योग आहेत आणि व्यापार विस्तारात यश मिळेल. आरोग्याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच प्रेमसंबंधात छोटे-मोठे वाद होण्याची शक्यता आहे.
टीप: वरील ज्योतिषशास्त्रावरील माहिती ही इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची जन्मपत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.