Holi Astrology 2026 |
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी होळीचा सण एका खास खगोलीय योगात साजरा केला जाईल. या काळात मायावी ग्रह राहु, छाया ग्रह केतू, देवांचे गुरु बृहस्पति (गुरु) आणि व्यापाराचा कारक बुध हे ग्रह वक्री चालीने भ्रमण करतील. ग्रहांची ही विशेष स्थिती काही राशींसाठी मोठे बदल आणि प्रगतीचे संकेत देत आहे. ग्रहांच्या या बदलाचा प्रभाव सर्व १२ राशींवर पडणार असला, तरी तीन राशींच्या जातकांसाठी हा काळ करिअर, व्यापार आणि आर्थिक बाबतीत अतिशय सकारात्मक ठरू शकतो.
वैदिक ज्योतिषानुसार, जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो, तेव्हा तो त्या ग्रहाशी संबंधित विषयांवर पुनर्विचार आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे संकेत देतो. वक्री ग्रह नेहमीच वाईट फळ देतात असे नाही; उलट ही वेळ आत्मपरीक्षण, सुधारणा आणि नवीन रणनीती बनवण्याची संधी असते. संयम आणि सावधगिरीने काम केल्यास या ऊर्जेचा सकारात्मक वापर करता येतो.
चार ग्रहांची वक्री चाल मिथुन राशीच्या जातकांसाठी नोकरीत नवीन दिशा मिळेल. रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील. पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत.जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. भागीदारीतील कामात सुधारणा होईल. होळीनंतर आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमच्या योजना यशस्वी होतील.
ग्रहांची ही स्थिती तूळ राशीच्या जातकांसाठी सकारात्मक ठरेल. धोरणात्मक निर्णय तुमच्या फायद्याचे ठरतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यापाराचा विस्तार करण्याच्या योजना यशस्वी होतील. परदेशाशी संबंधित कामातून लाभाचे योग आहेत.
ग्रहांची उलट चाल मकर राशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी ठरू शकते.करिअरमध्ये स्थिरता येईल आणि नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मालमत्ता किंवा गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे.उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण झाल्याने आर्थिक बाजू सुधारेल.
टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.