Budh Gochar 2026
मुंबई : ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा 'बुध' ग्रह वेळोवेळी आपले नक्षत्र बदलत असतो. सध्या बुध स्वतःच्या मिथुन राशीत आणि मृगशिरा नक्षत्रात विराजमान आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी बुधाच्या चालीत मोठा बदल होणार आहे. पंचांगानुसार, उद्या सकाळी ०६ वाजून १४ मिनिटांनी बुध 'आर्द्रा' नक्षत्रात प्रवेश करेल. आर्द्रा नक्षत्राचा स्वामी 'राहु' मानला जातो. राहुच्या नक्षत्रात बुधाचे हे मार्गक्रमण काही राशींसाठी सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. १० जूनपर्यंत कोणत्या राशींचे नशीब चमकणार हे जाणून घेऊया.
सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत लाभदायी ठरणार आहे.कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या नवीन प्रोजेक्टची मोठी जबाबदारी मिळू शकते. व्यापारात चांगला धनलाभ होण्याचे योग आहेत. जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा वाढवण्यासाठी संवाद उपयुक्त ठरेल. समाजात मान-सन्मान वाढेल. आरोग्यामध्ये सकारात्मक सुधारणा दिसून येईल. तसेच प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल.
मिथुन राशी जातकांना बुधाचे राहुच्या नक्षत्रात जाणे फायदेशीर सिद्ध होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नफ्याचे प्रमाण वाढेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडतील आणि आत्मविश्वास वाढेल.मुलांकडून एखादी आनंदाची बातमी समजू शकते. एखाद्या विशेष कामासाठी किंवा मनोरंजनासाठी प्रवासाचे योग आहेत. नशिबाची पूर्ण साथ लाभेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे गोचर अत्यंत शुभ मानले जात आहे. व्यवसायात तुम्ही आखलेल्या नवीन योजना यशस्वी ठरतील आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांसोबत दर्जेदार वेळ घालवता येईल. मित्र किंवा नातेवाईकांसोबत पर्यटनाचा प्लॅन तयार होऊ शकतो. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा अधिक सुधारेल आणि मानसिक शांतता लाभेल.