मुंबई : मे २०२६ हा महिना ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात एकामागोमाग एक अशा ४ ग्रहांचे राशी परिवर्तन होणार असून, काही ग्रहांचा अस्त होणार आहे, तर काही ग्रहांचा उदय होणार आहे.. ग्रहांच्या या महागोचरमुळे काही राशींना संपूर्ण महिनाभर नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे.
सूर्य गोचर: ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला राशी बदलतो. मे महिन्यात सूर्य मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. यामुळे सरकारी लाभ, आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि सामाजिक सन्मानात वाढ होईल.
मंगल देव मे महिन्यात स्वराशीत प्रवेश करतील. विशेष म्हणजे या महिन्यात मंगळाचा उदयही होणार आहे. तर शुक्र १४ मे रोजी राशी परिवर्तन करून मिथुन राशीत प्रवेश करेल. १ मे २०२६ रोजी बुध ग्रह अस्त होईल आणि १५ मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करेल. सूर्यासोबत बुधाची युती झाल्याने 'बुधादित्य योग' तयार होईल, जो निर्णयक्षमता सुधारण्यास आणि प्रगतीच्या नवीन संधी मिळवून देण्यास मदत करेल.
मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना आत्मविश्वास आणि लाभ घेऊन येत आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. मंगळाचे तुमच्या राशीत आगमन झाल्यामुळे आणि सूर्याच्या शुभ प्रभावामुळे ऊर्जेत वाढ होईल आणि तुमची सर्व प्रलंबित कामे यशस्वीपणे पूर्ण होतील.
वृषभ राशीसाठी मे महिना धन-संपत्तीच्या दृष्टीने आनंदाची बातमी घेऊन येईल. ग्रहांच्या विशेष संयोगामुळे नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांत उत्पन्नाचे स्रोत वाढतील. वैयक्तिक आयुष्यातही आनंदाचे क्षण येतील. या काळात घेतलेले ठोस निर्णय तुमच्या भविष्यातील नियोजनासाठी फायदेशीर ठरतील.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या महिन्यात मानसिक शांतता लाभेल. जर तुम्ही गेल्या काही काळापासून भावनिकदृष्ट्या त्रस्त असाल, तर तो त्रास आता कमी होईल. आर्थिक समस्यांची गुंतागुंत सुटेल आणि परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होऊन तणाव कमी होईल.