Mangal Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला 'ग्रहांचा सेनापती' मानले जाते. मंगळ दर महिन्याला आपले नक्षत्र बदलतो. मंगळाचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरते, तर काहींसाठी नव्या आव्हानाचे कारण बनू शकते. सध्या मंगळ ग्रह वृषभ राशीत विराजमान आहे. हिंदू पंचांगानुसार, ग्रहांचे सेनापती मंगळ आता रोहिणी नक्षत्रातून बाहेर पडून मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, मृगशिरा नक्षत्राचा स्वामी स्वतः मंगळ ग्रहच आहे. त्यामुळे २४ जुलै २०२६ रोजी मंगळ स्वतःच्याच नक्षत्रात गोचर करणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाचा आपल्या स्वतःच्या मृगशिरा नक्षत्रातील हा प्रवेश ३ राशींसाठी प्रचंड लाभदायक ठरणार आहे. मंगळाचे हे गोचर मेष, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. जाणून घेऊया या ३ राशींवर नेमका कसा प्रभाव पडणार आहे याविषयी....
मेष राशीच्या जातकांसाठी मंगळाचे मृगशिरा नक्षत्रातील गोचर अत्यंत फायदेशीर ठरू शकते. आयुष्यात काही नवीन आणि सकारात्मक बदल घडून येतील. नोकरी आणि करिअरच्या ठिकाणी प्रगतीचे अनेक नवे मार्ग खुले होतील. अपत्याकडून सुखद वार्ता मिळेल.व्यापाऱ्यांना पैशांच्या व्यवहारात किंवा गुंतवणुकीत मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे नक्षत्र परिवर्तन भाग्यकारक ठरणार आहे. कुटुंब आणि जोडीदारासोबत उत्तम आणि आनंदाचा वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यवसायातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील आणि आर्थिक बाजू मजबूत होईल. कामाच्या निमित्ताने किंवा व्यवसायानिमित्त फायदेशीर प्रवास घडू शकतात.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळाचे मृगशिरा नक्षत्रातील गोचर अतिशय शुभ संकेत घेऊन येत आहे. आयुष्यात बऱ्याच काळापासून चालू असलेल्या अडचणी आता संपतील. नशिबाची पूर्ण साथ लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल आणि कौटुंबिक वाद हळूहळू संपुष्टात येतील. मित्र किंवा कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर फिरण्याचा प्लॅन बनू शकतो.