Mangal Gochar 2026  Pudhari
ज्योतिष आणि धार्मिक

Mangal Gochar 2026 : मंगळाचा वृषभ राशीत प्रवेश; 'या' राशींना होणार बंपर फायदा, काहींनी राहावे सावधान!

मंगळ राशी बदलतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनावर पाहायला मिळतो

पुढारी वृत्तसेवा

Mangal Gochar 2026 : २१ जून रोजी मंगळ ग्रह वृषभ राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात मंगळाला उत्साह, धाडस, जमीन-जुमला, नोकरी आणि संघर्षाचा कारक मानले जाते. जेव्हा मंगळ आपली राशी बदलतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनावर पाहायला मिळतो. काही राशींसाठी हा काळ प्रगती घेऊन येतो, तर काहींना आपल्या निर्णयांमध्ये थोडी खबरदारी घ्यावी लागते. यावेळी मंगळ हा शुक्राची राशी असलेल्या वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत अनेक राशींच्या कामात, आर्थिक स्थितीत आणि नातेसंबंधांत मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

मेष आणि वृषभ राशीला मिळणार दिलासा

  • मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहू शकते. रखडलेले पैसे परत मिळण्याची किंवा बचत वाढवण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. कुटुंबातील वातावरणही आनंदी राहील.

  • वृषभ राशीच्या लोकांसाठी हे गोचर अत्यंत विशेष मानले जात आहे. बऱ्याच काळापासून रेंगाळलेली कामे आता गती घेतील. समाजात किंवा कामाच्या ठिकाणी तुमचे म्हणणे ऐकले जाईल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी सुवर्णकाळ

  • कर्क राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. एखाद्या जुन्या ओळखीचा किंवा संपर्काचा फायदा होण्याची चिन्हे आहेत.

  • सिंह राशीच्या लोकांची जबाबदारी वाढू शकते. कामाचा ताण जास्त असेल, परंतु त्या प्रमाणात फायदा मिळण्याचीही पूर्ण शक्यता आहे. काही लोकांना प्रवासाचे योग आहेत.

  • कन्या राशीच्या लोकांना नशिबाची खंबीर साथ मिळताना दिसेल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळू शकते. रखडलेली कामे पुढे सरकतील.

मिथुन आणि तूळ राशीने घ्यावी काळजी

  • मिथुन राशीच्या लोकांना आपल्या खर्चावर आणि आरोग्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. छोटीशी निष्काळजीपणाही तुमची अडचण वाढवू शकते.

  • तूळ राशीच्या लोकांनाही आरोग्याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजू नीट तपासून घ्या.

वृश्चिक, धनु आणि मकर राशीची स्थिती कशी असेल?

  • वृश्चिक राशीच्या लोकांच्या नातेसंबंधांत काही बदल जाणवू शकतात. लग्न किंवा भागीदारी संबंधित बाबींमध्ये घाईघाईने निर्णय घेणे टाळावे.

  • धनु राशीच्या लोकांना जास्त मेहनत करावी लागू शकते. स्पर्धा वाढेल, परंतु सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांना चांगला फायदाही मिळू शकतो.

  • मकर राशीच्या लोकांसाठी नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने हा काळ उत्तम राहू शकतो. एखादी नवीन जबाबदारी किंवा चांगली संधी तुमच्या पदरात पडू शकते.

कुंभ आणि मीन राशीला मिळणार सहकार्य

  • कुंभ राशीच्या लोकांना कुटुंब आणि मित्रांची खंबीर साथ मिळेल. व्यवसायातही चांगला नफा होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक सुधारलेले दिसेल.

  • मीन राशीच्या लोकांचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. ऑफिसमध्ये वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, तसेच नातेसंबंधांमधील जवळीक वाढेल.

    टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT