प्रातिनिधिक छायाचित्र.  Pudhri Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Mangal Gochar 2026 | शनीच्या नक्षत्रात होणार मंगळाचे गोचर; 'या' ३ राशी अनुभवणार 'अच्छे दिन'

सोमवारी, ६ एप्रिल २०२६ रोजी ग्रहसेनापती मंगळ उत्तरभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करेल

पुढारी वृत्तसेवा

Mangal Gochar 2026

ग्रहसेनापती मंगळ लवकरच आपली चाल बदलणार आहे. मंगळाच्या हालचालींचा परिणाम मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींवर दिसून येतो. मंगळाचे हे गोचर काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते, तर काही राशींना आयुष्यात अडचणींचा सामनाही करावा लागू शकतो. सध्या मंगळाचे गोचर पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात होत आहे. उद्या, सोमवारी, ६ एप्रिल २०२६ रोजी ग्रहसेनापती मंगळ आपली चाल बदलून उत्तरभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. उत्तरभाद्रपदा नक्षत्राचे स्वामी शनी देव आहेत. मंगळ या नक्षत्रात २३ एप्रिलपर्यंत विराजमान असतील. मंगळाने नक्षत्र बदलल्यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. जाणून घेवूया या राशींविषयी...

मिथुन

मिथुन राशीच्‍या जातकांसाठी अनुकूल परिस्‍थिती

शनीच्या उत्तरभाद्रपदा नक्षत्रात मंगळाचे गोचर मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. या गोचरमुळे तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. काही नोकरदार व्यक्तींचे प्रमोशन होऊ शकते. कमाईचे नवीन मार्ग तुमच्यासमोर उघडतील. मालमत्ता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. काही लोकांना परदेशातूनही नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

मेष

मेष राशीचे जातकांना होईल व्‍यवसायात फायदा

मेष राशीच्या लोकांसाठी शनीच्या उत्तरभाद्रपदा नक्षत्रात मंगळाचे गोचर फायदेशीर ठरेल. तुम्हाला व्यवसायात फायदेशीर सौदे मिळू शकतात. ज्यांना नोकरी बदलायची आहे, त्यांना नवीन ऑफर मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. घरातील वातावरण शांत राहील. आपल्या जोडीदाराशी शांततेने वागा.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्‍या जातकांच्‍या आत्‍मविश्‍वासात होईल वाढ

शनीच्या उत्तरभाद्रपदा नक्षत्रात मंगळाचे गोचर वृश्चिक राशीसाठी शुभ मानले जात आहे. तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहील. या काळात तुम्ही खूप आत्मविश्वासपूर्ण अनुभव कराल. धार्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल. सुख-समृद्धीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. काही लोकांचे उत्पन्नही वाढू शकते. बचत करणे सोपे जाईल. काही लोकांच्या पदोन्नतीचीही शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT