Mahashivratri 2026 : महाशिवरात्री पासून ‘या’ तीन राशींचे फुलणार भाग्य; १५ फेब्रुवारीनंतर होणार मोठे बदल  file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Mahashivratri 2026 : महाशिवरात्री पासून ‘या’ तीन राशींचे फुलणार भाग्य; १५ फेब्रुवारीनंतर होणार मोठे बदल

१५ फेब्रुवारीनंतर महाशिवरात्रीचा महायोग! ‘या’ तीन राशिंना मिळणार धन-यशाचा लाभ

पुढारी वृत्तसेवा

mahashivratri 2026 rashifal 15 february grah gochar mangal budh chandra labh 3 rashi

पुढारी ऑनलाईन :

Mahashivratri 2026 या वर्षी 15 फेब्रुवारी या दिवशी महाशिवरात्री येत आहे. या दिवशी मंगळ, बुध आणि चंद्र हे विशेष संक्रमण करणार आहेत. या दुर्मीळ ज्योतिषीय संयोगाचा परिणाम अनेक राशिंवर पडणार आहे. मात्र वृषभ, कर्क आणि तुळ राशिंसाठी हा दिवस अधिक भाग्यकारक ठरू शकतो.

देवांचे देव महादेव यांना समर्पित असलेला महाशिवरात्रीचा सण त्‍यांच्या भक्तांसाठी खास दिवस असतो. अनेक भक्तजण या दिवशी निर्जली किंवा फळाहार घेउन उपवास करतात. तर काही भक्त रात्रभर जागून शिवलिंगाला अभिषेक करून मंत्रपठण करतात. या वर्षी 15 फेब्रुवारी 2026 दिवशी महाशिवरात्री संपन्न होणार आहे. या वर्षी हा सण केवळ धार्मिक दृष्टीकोनातूनच नाही तर ज्योजिषिय स्वरूपातही महत्‍वाचा असणार आहे.

द्रिक पंचांगानुसार, या वर्षीच्या महाशिवरात्रीचा दिवस खूपच विशेष असणार आहे. या दिवशी तीन मोठे ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. मंगळ धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. चंद्र मकर राशित राहणार आणि रात्रीच्या वेळी बुध पर्वाभाद्रपद नक्षत्रात मार्गक्रमण करतील. या तीन्ही ग्रहांच्या चालींचा परिणाम सर्व राशिंवर होणार आहे. मात्र खास करून 3 राशिंना हा दिवस शुभ संकेत घेवून येउ शकतो.

वृषभ रास :

महाशिवरात्री दिवशी ग्रहांची अनुकूल स्थिती वृषभ राशीवाल्यांना मानसिक समाधान देउ शकते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी कमी होतील. नोकरीचा शोध घेत असलेल्या लोकांना चांगली बातमी समजेल. आर्थिक स्थिती चांगली जाणवू लागेल. खर्चांवरही नियंत्रण येईल. नात्‍यांमध्ये गोडवा निर्माण होईल. जे लोक प्रेमामध्ये आहेत त्‍यांचा एकमेकांवरील विश्वास दृढ बनेल. आरोग्य चांगले राहील.

कर्क रास :

कर्क राशिवाल्यांसाठी महाशिवरात्री सकारात्‍मक परिणाम देउ शकते. उपवर तरूण-तरूणींसाठी विवाहाचे प्रस्ताव येउ शकतात. पती-पत्‍नीमधील नाते मधून होईल. या राशितील कोणाची तब्येत बरी नसेल तर त्‍यांना आता आराम पडेल. आर्थिक परिस्थितीही समाधानकारक असेल. अचानक लाभाच्या घटना होतील.

तुळ रास :

तुळ राशिवाल्यांसाठी हा दिवस भाग्यकारक ठरेल. नोकरीपेशातील लोकांचे या काळात कौतूक होईल. अनेक दिवसांपासून घेतलेल्या मेहनतची आता फळ आता मिळणार आहे. घर आणि कुटुंबातही सकारात्‍मक बदल दिसू लागतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहील. मुलांबाबतील कोणतीतरी अडचण असेल तर तीचेही निराकाण या काळात होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT