जॉनी लिव्हरला मिळाली सून? जेसीसोबतच्या 'त्‍या' मिस्ट्री गर्लने वेधले लक्ष

मुलगा जेसीसोबत ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये बार्बीसारख्या दिसणाऱ्या मुलीकडे साऱ्यांच्या नजरा
johny lever son jessy lever spotted with mystery girl
जॉनी लिव्हरला मिळाली सून? जेसीसोबतच्या 'त्‍या' मिस्ट्री गर्लने वेधले लक्षfile photo
Published on
Updated on

johny lever son jessy lever spotted with mystery girl in black short dress

मुंबई : पुढारी ऑनलाईन

जॉनी लिव्हरचा मुलगा जेसी लीव्हर अलीकडेच एका मिस्ट्री गर्लसोबत दिसून आला आहे. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चर्चा सुरू झाली आहे की जेसीसोबत दिसलेली ही मिस्ट्री गर्ल त्याची गर्लफ्रेंड असू शकते. मात्र, याबाबत आतापर्यंत स्टारकिडकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

johny lever son jessy lever spotted with mystery girl
Main Hoon Na 2 विषयी मोठे अपडेट! कोण-कोण कलाकार? शाहरुखच्या स्टोरी येणार नवं ट्विस्ट?

जॉनी लिव्हर यांनी चित्रपटसृष्टीत चार दशकांहून अधिक काळ काम केले आहे. जरी त्यांनी अनेक यशस्वी चित्रपट दिले असले, तरी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतारही आले. उत्कृष्ट कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जाणारे जॉनी लीव्हर आता कमी चित्रपटांत दिसतात, पण आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.

जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी लिव्हरही हळूहळू फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. अलीकडेच ती कपिल शर्मा स्टारर ‘किस किस को प्यार करूं 2’ मध्ये दिसली होती. मात्र, जॉनी लीव्हरचा मुलगा जेसी लीव्हर फारसा चर्चेत नसतो. पण नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमुळे त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

johny lever son jessy lever spotted with mystery girl
Bigg Boss Marathi-6 | कुल बॉईज रोशन-ओमकारमध्ये जुंपलं, घरात नवा ड्रामा?

मिस्ट्री गर्लसोबत दिसला जेसी लिव्हर

अलीकडेच जेसी लिव्हरचा एक स्पॉटेड व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत एक मिस्ट्री गर्लही दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चा सुरू झाली आहे की ही मुलगी जॉनी लीव्हरची होणारी सून आणि जेसीची गर्लफ्रेंड असू शकते. व्हिडीओमध्ये जेसी ब्लॅक जीन्स आणि व्हाईट शर्टमध्ये दिसत आहे, तर त्याच्यासोबत असलेली मिस्ट्री गर्ल ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये अतिशय स्टायलिश आणि गोंडस दिसत आहे.

नेटकऱ्यांच्या मनात प्रश्न

जेसी लिव्हर आणि मिस्ट्री गर्लचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक युजर्स म्हणत आहेत की दोघे ज्या पद्धतीने एकमेकांसोबत कम्फर्टेबल दिसतात आणि एकत्र पोज देतात, त्यावरून काहीतरी नक्कीच सुरू असल्यासारखे वाटते. काहींनी थेट दावा केला आहे की ही मुलगी जेसीची गर्लफ्रेंड आहे, तर काही जण विचारत आहेत की ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे? मात्र, अद्याप जेसी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. जेसी लिव्हर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर त्याचे सुमारे २ लाख फॉलोअर्स आहेत.

गंभीर आजाराशी झुंज दिली होती जेसीने

जॉनी लिव्हर यांनी अलीकडेच एका मुलाखतीत मुलगा जेसीबद्दल सांगितले होते की तो एकेकाळी गंभीर आजाराशी झुंज देत होता. जेसीच्या मानेत ट्यूमर होता आणि तो काढणे अतिशय जोखमीचे होते. डॉक्टरांनी सांगितले होते की त्याच्या डोळ्यांची दृष्टी जाण्याचा आणि पॅरालिसिस होण्याचा धोका होता. त्या वेळी जेसीचे वय फक्त १२ वर्षे होते. यानंतर संपूर्ण कुटुंब जेसीला घेऊन अमेरिकेत गेले आणि तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आणि आज जेसी पूर्णपणे निरोगी व कॅन्सरमुक्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news