मकर राशीत या चार ग्रहांच्या एकत्र येण्यामुळे 'चतुर्ग्रही योग' निर्माण होत आहे. या ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींच्या व्यक्तींसाठी अच्छे दिन सुरू होणार असून, करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे.
January 2026 Predictions : वैदिक पंचांगानुसार, २०२६ वर्षाची सुरुवात ज्योतिषीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जानेवारी महिन्यात तब्बल चार प्रमुख ग्रह आपली राशी बदलणार आहेत. यामध्ये ग्रहांचा राजा सूर्य १४ जानेवारीला मकर राशीत प्रवेश करेल (मकर संक्रांत). त्यानंतर ग्रहांचा सेनापती मंगळ, बुध (१७ जानेवारी) आणि संपत्तीचा कारक शुक्र हे देखील मकर राशीत मार्गस्थ होतील.
जानेवारी महिन्यातील ग्रहांचे परिवर्तन मकर राशीच्या जातकांसाठी अत्यंत फलदायी ठरेल, कारण हे बदल तुमच्याच राशीत (लग्न भाव) होत आहेत. मकर राशीच्या जातकांच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. समाजात प्रतिष्ठा आणि मान-सन्मान मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. अविवाहितांसाठी विवाहाचे योग येतील. कुटुंब आणि मित्रांच्या मदतीने हाती घेतलेली कामे यशस्वी होतील.
तूळ राशीच्या जातकांसाठी हा काळ सकारात्मक बदलांचा असेल. हा गोचर राशीच्या चौथ्या स्थानात होत आहे. त्यामुळे भौतिक सुखात वाढ होईल. वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग आहेत.नोकरीत पदोन्नती (Promotion) किंवा पगारवाढीची शक्यता आहे. व्यावसायिकांना लाभ होईल.वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता असून सासरच्या मंडळींशी संबंध सुधारतील.
करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने मेष राशीसाठी हा गोचर वरदान ठरू शकतो. हे बदल तुमच्या राशीच्या दशम (कर्म) भावात होत आहेत.नवीन व्यापार सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. नवीन भागीदारीतून नफा मिळेल.नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची सुवार्ता मिळू शकते.डिलांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि त्यांचे मार्गदर्शन प्रगतीसाठी पूरक ठरेल.