प्रातिनिधिक छायाचित्र.  Pudhari
ज्योतिष आणि धार्मिक

Guru Gochar 2026 | गुरुची चाल बदलणार; 'या' ४ राशींना मिळणार नशिबाची 'साथ'

Guru Gochar 2026 |२ जून २०२६ रोजी गुरु कर्क राशीत प्रवेश करेल

पुढारी वृत्तसेवा

Jupiter Transit in Cancer

ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला विशेष स्थान प्राप्त आहे. ग्रहांमधील सर्वात शुभ ग्रह मानला जातो. ज्ञान, भाग्य, सुख-समृद्धी, संतान, धर्म आणि धन यांचा कारक म्हणून गुरुची ओळख आहे. हा ज्ञानाचा देव, शिक्षक आणि उच्च शिक्षणाचा अधिपती आहे. गुरुची उच्च राशी कर्क असून मकर राशीत तो नीच स्थितेत असतो.

पाच महिने गुरु कर्क राशीत राहणार

२ जून २०२६ रोजी गुरु कर्क राशीत प्रवेश करणार असून साधारण पाच महिने म्हणजेच ३१ ऑक्टोबर पर्यंत याच राशीत विराजमान राहील. ज्योतिषशास्त्रात ही स्थिती अतिशय मजबूत मानली जाते, त्यामुळे याचा प्रभावही मोठ्या प्रमाणावर जाणवेल. या काळात काही राशींसाठी आर्थिक स्थिती, करिअर आणि संधींच्या बाबतीत मोठे सकारात्मक बदल घडून येतील.

मेष राशीच्‍या जातकांच्‍या सुखसुविधेत वाढ

मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ कौटुंबिक सुख आणि आरामाच्या साधनांमध्ये वाढ करणारा ठरेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून घर, मालमत्ता किंवा एखाद्या मोठ्या निर्णयाबाबत विचार करत असाल, तर आता त्या गोष्टी मार्गी लागतील. आर्थिक आघाडीवर अचानक दिलासा मिळू शकतो—कुठे अडकलेले पैसे परत मिळतील किंवा उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण होईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी किंवा चांगल्या पदोन्नतीची बातमी मिळू शकते.

कर्क राशीच्‍या जातकांच्‍या मान-सन्मान होणार वाढ

कर्क राशीच्या व्यक्तींना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे, कारण गुरु स्वतः तुमच्याच राशीत प्रवेश करत आहे. याचा सकारात्मक परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि कामावर दिसून येईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि कामाची दखल घेतली जाईल. नोकरी आणि व्यवसाय दोन्ही क्षेत्रांत प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती सुधारेल आणि रखडलेली कामे हळूहळू पूर्ण होतील.

वृश्चिक राशीच्‍या जातकांना मिळणार नशिबाची साथ

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ नशिबाची साथ देणारा ठरेल. कामात येणारे अडथळे आता दूर होतील. प्रवासातून लाभ मिळण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या नवीन संधीशी तुमची नाळ जुळेल. जर एखादे न्यायालयीन प्रकरण किंवा कागदोपत्री काम अडकले असेल, तर त्यात दिलासा मिळू शकतो. व्यवसायात मोठी डील फायनल होऊ शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

मीन राशीच्‍या जातकांच्‍या करिअरमध्‍ये होणार सुधारणा

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्पन्न आणि करिअर या दोन्हीमध्ये सुधारणा घडवून आणणारा असेल. नोकरीत बढती किंवा मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः मीडिया, लेखन, कला किंवा शेअर मार्केट यांसारख्या क्षेत्रांशी संबंधित असलेल्यांना या काळात उत्तम फायदा मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची आशा निर्माण होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT