February 2026 Astrology: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने फेब्रुवारी २०२६ हा महिना अत्यंत खास असणार आहे. या महिन्यात ग्रहांची चाल असे काही योगायोग घडवून आणत आहे, ज्यामुळे अनेक मोठे आणि प्रभावशाली राजयोग निर्माण होतील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, शनीची राशी असलेल्या कुंभ राशीत एकाच वेळी सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र यांचा प्रवेश होणार आहे. या चार ग्रहांच्या एकत्रित स्थितीमुळे अनेक शुभ आणि फलदायी योग येतील.
फेब्रुवारीच्या सुरुवातीला, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी बुद्धी आणि व्यापाराचा कारक ग्रह बुध कुंभ राशीत प्रवेश करून राहूसोबत युती करेल. त्यानंतर ६ फेब्रुवारीला शुक्र, १३ फेब्रुवारीला सूर्य आणि २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मंगळ कुंभ राशीत गोचर करतील. ग्रहांच्या या हालचालीमुळे लक्ष्मीनारायण योग, शुक्रादित्य योग, आदित्य मंगळ योग, बुधादित्य योग आणि चतुर्ग्रही योग यांसारखे शक्तिशाली संयोग तयार होतील. या योगांचा विशेष लाभ ४ राशींना मिळणार आहे.
मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी २०२६ सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. प्रगतीची संधी मिळेल आणि पदोन्नतीच्या चर्चांना वेग येईल. उत्पन्न वाढण्याचे नवीन मार्ग खुले होतील. खर्च वाढला तरी आर्थिक समतोल राहील. व्यापाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मंगळवारी लाल डाळिंबाचे दान करा आणि हनुमान चालीसाचे नियमित वाचन करा.
वृषभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी हा एका नवीन पर्वाची सुरुवात असेल. विशेषतः १७ फेब्रुवारीनंतर परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल आणि प्रदीर्घ काळ रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन नोकरी किंवा बदलीची संधी मिळू शकते. व्यवसायानिमित्त प्रवास घडू शकतात. शनिवारी गरजू किंवा दिव्यांग व्यक्तींना अन्नदान करणे शुभ राहील.
मिथुन राशीसाठी फेब्रुवारी महिना दिलासादायक ठरेल. ज्या कामांमध्ये अडथळे येत होते, ती आता पूर्ण होऊ लागतील. आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा रुळावर येईल. मानसिक ताण कमी होईल आणि नशिबाची साथ मिळेल. आर्थिक लाभाचे संकेत असून गुंतवणुकीतूनही फायदा होऊ शकतो. कुटुंब किंवा जोडीदारासोबत पर्यटनाचे योग येतील.
कन्या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना उन्नती आणि समृद्धी घेऊन येईल. व्यापाऱ्यांच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते. तुम्ही ज्या कामासाठी दीर्घकाळ प्रयत्न करत होता, त्यात यश मिळण्याचे प्रबळ योग आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि कुटुंबात सुख, शांती व आनंदाचे वातावरण राहील.