Vastu Tips : बाथरूममध्ये ‘या’ गोष्टी चुकूनही ठेवू नका; घरातील सुख-समृद्धीवर होऊ शकतो परिणाम! file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Vastu Tips : बाथरूममध्ये ‘या’ गोष्टी चुकूनही ठेवू नका; घरातील सुख-समृद्धीवर होऊ शकतो परिणाम!

वास्तुशास्त्रानुसार, या वस्तू बाथरूममध्ये ठेवणे अशुभ मानले जाते.

पुढारी वृत्तसेवा

Do not keep ‘these’ things in the bathroom, even by mistake; it could affect the happiness and prosperity of your home!

पुढारी ऑनलाईन : आपल्या घरातील सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा कायम ठेवायची असेल, तर आजच बाथरूममध्ये असलेल्या काही गोष्टी बाहेर काढून टाका. वास्तुशास्त्रानुसार, या वस्तू बाथरूममध्ये ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा संचार होऊन वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

बाथरूममध्ये ठेवू नयेत या गोष्टी

तुटलेली काच किंवा आरसा

बाथरूममध्येच नव्हे, तर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात तुटलेली काच किंवा आरसा ठेवू नये. तुटलेली काच नकारात्मक ऊर्जेचे केंद्र बनते, असे वास्तुशास्त्रात मानले जाते.

सुकलेली रोपे

बाथरूममध्ये रोपे ठेवणे शुभ मानले जात नाही. तसेच घराच्या कोणत्याही भागात सुकलेली रोपे ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, अशी मान्यता आहे.

खराब नळ

बाथरूममधील खराब किंवा सतत गळणारा नळ वास्तुदोषाचे कारण ठरू शकतो. नळातून सतत पाणी टपकत राहिल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आर्थिक स्थितीवरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, असे वास्तुशास्त्र सांगते.

तुटलेली किंवा फाटलेली चित्रे

बाथरूमला आकर्षक लुक देण्यासाठी अनेकजण तिथे चित्रे लावतात. मात्र, तुटलेली, खराब किंवा फाटलेली चित्रे बाथरूममध्ये लावू नयेत. यामुळे घरातील वातावरणात कलह आणि तणाव निर्माण होतो, अशी मान्यता आहे.

ओले किंवा घाणेरडे कपडे

घाई किंवा आळसामुळे अनेकजण बाथरूममध्ये ओले अथवा घाणेरडे कपडे साठवून ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार, ही सवय वास्तुदोषासोबतच सूर्यदोषालाही कारणीभूत ठरू शकते.

रिकामी बादली

बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे शुभ मानले जात नाही. विशेषतः सकाळी उठल्यानंतर रिकामी बादली दिसल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. त्यामुळे बादलीत थोडे पाणी भरून ठेवावे. तसेच तुटलेली किंवा खराब बादलीही बाथरूममध्ये ठेवू नये.

डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती वास्तुशास्त्रातील मान्यता आणि उपलब्ध माहितीनुसार आहे. याच्या सत्यतेची किंवा अचूकतेची आम्ही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT