Chandra Gochar Pudhari
ज्योतिष आणि धार्मिक

Chandra Gochar : ३ दिवसांनंतर शनीच्या राशीत चंद्राचे भ्रमण, या ४ राशींना मिळणार दिलासा

चंद्राचे भ्रमण शनीच्या राशीत होईल, तेव्हा ते प्रगतीचे योग आणि नवीन संधी घेऊन येईल

पुढारी वृत्तसेवा

Chandra Gochar : २८ जुलैला चंद्र मकर राशीत प्रवेश (गोचर) करणार आहे, ज्याचा फायदा मेष, कर्क, मकर आणि मीन या राशींच्या लोकांना होईल. ज्योतिषाच्या गणनेनुसार चंद्र कोणत्याही राशीत फक्त सव्वादोन दिवस भ्रमण करतो. आजपासून तीन दिवसांनंतर जेव्हा चंद्राचे भ्रमण शनीच्या राशीत होईल, तेव्हा ते प्रगतीचे योग आणि नवीन संधी घेऊन येईल.

चंद्र मन आणि भावनांचा कारक

ज्योतिषशास्त्रात चंद्राला मन आणि भावनांचा कारक मानले जाते. अशा स्थितीत २८ तारखेला संध्याकाळी पावणेआठ वाजल्यापासून (७:४५) चंद्र काही राशींसाठी दिलासा घेऊन येऊ शकतो. कामे काही काळापासून अडकली होती किंवा कोणत्याही गोष्टीमुळे मन अस्वस्थ होते, त्यांच्यासाठी परिस्थिती काही तासांतच बदलू शकते. जाणून घेवूया कोणत्‍या राशीला या परिवर्तनाचा लाभ होणार आहे याविषयी...

मेष राशीच्‍या जातांना मिळेल सुवार्ता

चंद्राचे हे भ्रमण मेष राशीच्या लोकांसाठी चांगली बातमी घेऊन येऊ शकते. ज्या कामाची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती, त्यात आता यश मिळू शकते. नोकरदार लोकांना नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कुठे मुलाखत दिली असेल, तर बातमी मिळण्याची पूर्ण आशा आहे. कुटुंबासोबत छान वेळ व्यतीत होईल. यासोबतच पैशांशी संबंधित प्रश्नही आता सुटताना दिसतील.

कर्क राशीच्‍या जातकांची मानसिक तणावातून होईल मुक्‍तता

चंद्राची स्वतःची रास कर्क आहे. या राशीच्या लोकांनाही २८ जुलैच्या संध्याकाळपासून काहीसा नक्कीच दिलासा मिळेल. गेल्या काही काळापासून काही मानसिक ताण असेल तर त्यावर आता मार्ग निघू शकतो. अडकलेला पैसा परत मिळेल. नवीन काम सुरू होऊ शकते. व्यावसायिकांना एखादा चांगला करार मिळू शकतो. तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि घरात एखादे शुभकार्यही घडू शकते. आरोग्य आधीपेक्षा सुधारेल.

मकर राशींच्‍या जातकांना आर्थिक बाबतीत मिळतील शुभ संकेत

शनीच्या याच राशीत चंद्राचे भ्रमण होत असल्यामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत शुभ संकेत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. दुसरीकडे, नोकरदार लोकांना वरिष्ठांकडून नवीन जबाबदारीसोबतच कौतुकही मिळेल. एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल, तर या काळात वेळ तुमच्या बाजूने असेल. यादरम्यान कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

मीन राशीचे जातक अनुभवतील मनशांती

चंद्राचे हे भ्रमण मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घेऊन येईल. मन शांत राहील आणि आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उत्तम असेल. परीक्षेत चांगला निकाल मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. यादरम्यान एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याचीही शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT